सरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण करणं होय, : देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजपमध्ये अजूनही आरोपांच सत्र सुरूच आहे. व्हेंटिलेटर खराब असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केंद्र सरकारवर केल्यानंतर आता त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीकडूनच सरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण करणं होय,” अशी टीका आता फडणवीस यांनी केली आहे.

भाजप नेते तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोला येथे भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या व्हेंटीलेटर नादुरुस्तबाबतच्या दाव्याला उत्तर दिले. यावेळी फडणवीसांनी राष्ट्रवादीवरच आरोप केला. फडणवीस म्हणाले, ” केंद्रातून भाजपकडून व्हेंटीलरेटर देऊनही ते खराब असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते म्हणत आहेत. राष्ट्रवादीतील नेते खोटं बोलत असून त्यांच्याकडून राजकारण केले जात आहे. एखादा दुसरा व्हेंटिलेटर खराब आहे याऐवजी सरसकट खराब आहे असं म्हणणं म्हणजे यालाच राजकारण करणं असं फडणवीसांनी म्हंटल आहे.

वास्तविक पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला सुमारे 5 हजार व्हेंटिलेटर दिले आहेत. त्या पाच हजार व्हेंटीलेटरमधील जे काही व्हेंटिलेटर खराब आहेत दुरुस्त केले पाहिजेत, अशी आमचीही मागणी आहे. तसेच या मध्ये ज्या कोणाची चूक आहे. त्यांच्यावरही कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

Leave a Comment