औरंगाबाद प्रतिनिधी । नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ औरंगाबादमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने भव्य रैली आणि सभेच आयोजन करण्यात आलं होत. यावेळी शेकडो नागरिक या रैलीत सहभागी झाले होते. यावेळी पाकिस्तान मधून आलेल्या पाच नागरिकांच स्वागत करण्यात आलं.
क्रांती चौकमधून या रैलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी नागरिकांनी हातात तिरंगा झेंडा घेउन, मोदी मोदीच्या घोषणा दिल्या गेल्या. तसेच या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करना-याच्या विरोधात देखील घोषणा देण्यात आल्या. त्यामूळे क्रांती चौक घोषणांनी दणाणून गेला होता. हा मोर्चा क्रांती चौक, सतीश पेट्रोल पंप, स्वामी विवेकानंद कॉलेज, स्वातंत्र्यविर सावरकर पुतळा, निराला बाजार, महात्मा फुले पुतळा मार्गे काढण्यात आला होता. औरंगपुरा येतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन याठिकाणी सभा घेण्यात आली.
हा कायदा करताना विरोधकांचे खासदार यात सहभागी होते. मग विरोध करायचा कारण काय? असा सवाल हरिभाऊ बागडे यांनी उपस्थीत करत ला विरोध करना-याच्या विरोधात तोफ डागली. यावेळी पाकिस्तानहून इकडे आलेल्या किशोर बोदानी, वाल्मिक परसवाणी, अमृत नाथानी, नानिक कटारीया, विकी तलरेजा यांना या कायद्याचा मोठा फ़ायदा झाला असल्याने त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी पाकिस्तानने कशा पद्धतिने आमच्यावर अत्याचार केला यावर अमृत नाथानी यांनी प्रकाश टाकला.