मागच्या दोन तीन दिवसांत मुंबईत पाऊस झाल्यामुळे लोकलची सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे लोकल विलंबाने धावत होत्या. याचा परिणाम लोकलच्या प्रवाशांवर झाला. आता उद्या म्हणजेच रविवार (२८) रोजी देखील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा मेगा ब्लॉक
देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणाकरिता उपनगरीय रेल्वेच्या सेवा 29 सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेवर आज दिनांक 28 रोजी दहा तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर रविवारी रात्री हार्बर मार्गावर पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान काही लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.
मेन लाईन वर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक देण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान थीम या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. परिणामी लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा पंधरा मिनिटे उशिरा पोहोचणार आहेत.
हरभर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी 11-10 ते दुपारी चार-दहा वाजेपर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये कुर्ला ते वाशी दरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकावरून प्रवास करू शकतात.
रविवारी हार्बर मार्गावर 10 तासांचा पावर ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावरील सहाव्या रेल्वे मार्गाच्या नॉन इंटरलॉकिंग ची काम करण्यात येणार आहेत. यासाठी रविवारी 29 सप्टेंबर रोजी रात्री अंधेरी ते गोरेगाव दरम्यान आणि डाऊन हार्बर मार्गावर पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 12:30 ते सोमवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत दहा तासांचा हा ब्लॉग असणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये अंधेरी ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहेत. रविवारी रात्री 10:54 मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून गोरेगाव करिता शेवटची लोकल चालवण्यात येणार आहे.
ब्लॉक संपल्यानंतर सोमवारी सकाळी 10 वाजून 22 मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून गोरेगाव लोकल सुटणार आहे. तर गोरेगाव स्थानकातून अपमार्गावर सीएसएमटीकडे जाण्यासाठी सकाळी 11:23 मिनिटांनी लोकल चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.