पेट्रोल-डिझेलच्या नवीन किंमती जाहीर, आपल्या शहरातील आजचे दर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यात पेट्रोल डिझेलच्या झालेल्या निरंतर वाढीमुळे सर्वसामान्यांचा खिशावरील ताण वाढला होता. मात्र जुलै महिन्यात या वाढत्या किंमतींना ब्रेक लागल्याने लोकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. शुक्रवारी सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. आज राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ही 80.43 रुपये आहे. तर त्याच वेळी, डिझेलची किंमत ही कोणताही बदल न होता प्रति लिटर 80.78 रुपयांवर स्थिर आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर हे बदलत असतात. नवीन दर हे सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतएक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

देशातील मोठ्या शहरांमधील आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्या.

दिल्ली पेट्रोल 80.43 रुपये आणि डिझेल 80.78 रुपये आहे.
मुंबई पेट्रोल 87.19 रुपये आणि डिझेल 79.05 रुपये आहे.
कोलकाता पेट्रोल 82.10 रुपये आणि डिझेल 75.89 रुपये आहे.
चेन्नई पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझेल77.91 रुपये आहे.
नोएडा पेट्रोल 81.08 रुपये तर डिझेल 72.80 रुपये आहे.
गुरुग्राम पेट्रोल 78.64 रुपये तर डिझेल 72.98 रुपये आहे.
लखनऊ पेट्रोल 80.98 रुपये आणि डिझेल 72.70 रुपये आहे.
पटना पेट्रोल 83.31 रुपये तर डिझेल 77.61 रुपये आहे.
भोपाळ पेट्रोल 88.08 रुपये आणि डिझेल 80.17 रुपये आहे.
जयपूर पेट्रोल 87.57 रुपये आणि डिझेल 81.55 रुपये आहे.
चंदीगड पेट्रोल 77.41 रुपये आणि डिझेल 72.18 रुपये आहे.

अशाप्रकारे आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत कशी तपासावी
तुम्हाला आता एसएमएसद्वारेही पेट्रोल डिझेलचे दर माहित होतील. इंडियन ऑईलचे ग्राहक आरएसपी असे लिहून 9224992249 वर पाठवून याबाबत माहिती मिळवू शकतात तर बीपीसीएल ग्राहक आरएसपी असे लिहून 9223112222 वर पाठवून याबाबत माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकही एचपीप्राइस असे लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून त्याची किंमत जाणून घेऊ शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment