Wednesday, June 7, 2023

पुन्हा एकदा वाढली डिझेलची किंमत- आजचे पेट्रोलचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना अचानक भाव स्थिर झाल्याने सर्वसामान्यांना सलग आठ दिवस थोडा दिलासा मिळाला. मात्र आता मंगळवारी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी डिझेलच्या दरात 25 पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत आता एक लिटर पेट्रोलची किंमत 80.43 रुपये आहे. त्याच वेळी, एक लिटर डिझेलची किंमत 80.78 रुपये आहे. यापूर्वी जून महिन्यात सलग 21 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले होते. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर हे सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत ही जवळजवळ दुप्पट होते.

मग किंमती कशा वाढू लागल्या
तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील इंधनाच्या दरावर दिसून आला आहे. त्याबरोबरच इराण आणि जागतिक पातळीवर देखील तणाव वाढण्याची शक्यता आहे. वस्तुतः आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये असे वृत्त आहे की इस्त्राईलने मोठ्या प्रमाणात सायबर हल्ला केला आणि इराणच्या आण्विक तळांवर दोन स्फोट घडवून आणले. या वृत्ताचा क्रूड तेलाच्या किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळात कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्या
दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये आणि डिझेल लिटर 80.78 रुपये आहे.
मुंबई – पेट्रोलची किंमत 87.19 रुपये आणि डिझेलची किंमत 79.05 रुपये आहे.
कोलकाता – पेट्रोल 82.10 रुपये तर डिझेल 75.89 रुपये आहे.
चेन्नई – पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझेलची किंमत 77.91 रुपये आहे.
नोएडा – पेट्रोल 81.08 रुपये आणि डिझेल 72.80 रुपये आहे.
गुरुग्राम – पेट्रोल 78.64  रुपये तर डिझेल 72.98 रुपये आहे.
लखनऊ – पेट्रोल 80.98 रुपये तर डिझेल 72.70 रुपये आहे.
पटना- पेट्रोल 83.31 रुपये तर डिझेल 77.61 रुपये आहे.
भोपाळ- पेट्रोल 88.08 रुपये तर डिझेल 80.17 रुपये आहे.
जयपूर- पेट्रोल 87.57 रुपये तर डिझेल 81.55 रुपये आहे.
चंदीगड – पेट्रोल 77.41 रुपये आणि डिझेल 72.18 रुपये आहे.

अशाप्रकारे, आपण आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या दराचे दर हे मेसेजस द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलचे ग्राहक आरएसपी असे लिहून 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात तर बीपीसीएल ग्राहक हे आरएसपी लिहून 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना हे एचपीप्राइस लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून आजची किंमत जाणून घेऊ शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.