दिलासादायक! पेट्रोल-डिझेलच्या दरात सुरू असलेल्या वाढीला लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती न वाढल्यामुळे सर्वसामान्यांना याबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची किंमत ही सातत्याने वाढत होती, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतच गेल्या. पण गेल्या नऊ दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी असलेल्या आयओसीने बुधवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. त्यामुळे राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे दर हे प्रतिलिटर 80.43 रुपये तर डिझेलचे दर हे 80.78 रुपये होते.

दररोज सकाळी 6 वाजता किंमत बदलते
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत असतात. नवीन दर हे रोज सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत ही जवळजवळ दुप्पट होते.

आज देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती काय आहेत ते जाणून घ्या.

>> दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये आणि लिटर 80.78 रुपये आहे.
>> मुंबई – पेट्रोल 87.19 रुपये आणि डिझेल 79.05 रुपये आहे.
>> कोलकाता- पेट्रोल 82.10 आणि डिझेल 75.89 रुपये आहे.
>> चेन्नई- पेट्रोल 83.63 रुपये तर डिझेल 77.91 रुपये आहे.
>> नोएडा- पेट्रोल 81.08 रुपये तर डिझेल 72.80 रुपये आहे.
>> गुरुग्राम – पेट्रोल 78.64 रुपये तर डिझेल 72.98 रुपये आहे.
>> लखनऊ- पेट्रोल 80.98 रुपये तर डिझेल 72.70 रुपये आहे.
>> पाटणा- पेट्रोल 83.31 रुपये तर डिझेल 77.61 रुपये आहे.
>> भोपाळ- पेट्रोल 88.08 रुपये तर डिझेल 80.17 रुपये आहे.
>> जयपूर- पेट्रोल 87.57 रुपये तर डिझेल 81.55 रुपये आहे.
>> चंदीगड – पेट्रोल 77.41 रुपये तर डिझेल 72.18 रुपये आहे.

आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आपल्याला एसएमएसद्वारेही पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर माहित होऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक आरएसपी असे लिहून 9224992249 वर पाठवून याबाबत माहिती मिळवू शकतात तर बीपीसीएल ग्राहक हे आरएसपी असे लिहून 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना एचपीप्राइसला असे लिहून 9222201122 क्रमांकावर पाठवून त्याची किंमत जाणून घेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment