पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेल आणि विपणन कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. गेल्या 16 दिवसांत डिझेलच्या किंमतीत तीनदा वाढ करण्यात आली असली तरी पेट्रोलची किंमत मात्र स्थिर राहिली आहे. राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीत आज एक लिटर डिझेलची किंमत ही 81.18 रुपये प्रतिलिटर झाली आहे, तर पेट्रोलची किंमत ही प्रतिलिटर 80.43 रुपये आहे. सोमवारी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 11 पैसे आणि बुधवारी 13 पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर हे बदलत असतात. नवीन दर हे सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत ही जवळजवळ दुप्पट होते.

देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती काय आहेत ते जाणून घ्या

दिल्ली पेट्रोल 80.43 रुपये आणि 81.18 रुपये प्रतिलिटर आहे.
मुंबई पेट्रोलची किंमत 87.19 रुपये आणि डिझेलची किंमत 79.40 रुपये आहे.
कोलकाता पेट्रोल 82.10 रुपये तर डिझेल 76.33 रुपये प्रतिलिटर आहे.
चेन्नई पेट्रोलची किंमत 83.63 रुपये तर डिझेलची किंमत 78.22 रुपये आहे.
नोएडा पेट्रोल 81.08 रुपये तर डिझेल 73.13 रुपये आहे.
गुरुग्राम पेट्रोल 78.64 रुपये तर डिझेल 73.31 रुपये प्रतिलिटर आहे.
लखनऊ पेट्रोल 80.98 रुपये आणि डिझेल 73.03 रुपये आहे.
पटना पेट्रोल 83.31 रुपये आणि डिझेल 78.05 रुपये आहे.

डिझेलचे दर गेल्या 5 आठवड्यात 25 पट वाढले
प्रत्येक राज्य पेट्रोल आणि डिझेलवर वेगळा स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारतो. यामुळे, राज्यांनुसार ग्राहकांसाठी डिझेल आणि पेट्रोलचे दर बदलतात. 29 जून रोजी पेट्रोलच्या किंमतीत अंतिम बदल करण्यात आला होता. गेल्या 5 आठवड्यांत तर डिझेलच्या किंमतीत 25 पट वाढ झाली आहे आणि पेट्रोलच्या किंमती या 21 पटींनी वाढलेल्या आहेत.

अशाप्रकारे आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत कशी तपासावी
आता आपल्याला एसएमएसद्वारेही पेट्रोल डिझेलचे दर माहित होतील . इंडियन ऑईलचे ग्राहक हे आरएसपी असे लिहून 9224992249 वर पाठवून याची माहिती मिळवू शकतात तर बीपीसीएलचे ग्राहक हे आरएसपी असे लिहून 9223112222 वर पाठवून याची माहिती पाठवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहक एचपीप्राइस असे लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment