सोन्याच्या किंमतींमध्ये झाली आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ- चांदी 2550 रुपयांनी महागली, जाणून घ्या नवीन दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे जगभरात सोन्याच्या किंमती वाढलेल्या आहेत. म्हणूनच देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती जोरदार वाढ झालेली दिसून आली. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 430 रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी चांदीच्या दरातही 2,550 प्रति किलो रुपयांची मोठी वाढ झाली आहे.

सोन्याचे नवे दर
दिल्ली बुलियन बाजारामध्ये 99.9 टक्के सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 50,490 रुपयांवरून 50,920 रुपयांवर गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास, तिथे आज सोन्याची नवीन किंमत ही 1,850 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. मुंबईत स्टॅण्डर्ड सोन्याची (99.5 टक्के) किंमत प्रति दहा ग्रॅम 50,019 रुपये झाली आहे. त्याचबरोबर, 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम 50220 रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीचे नवे दर
चांदीच्या किंमतींमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ दिसून आली. दिल्लीत 1 किलो चांदीची किंमत ही 57,850 रुपयांवरून 60,400 रुपयांवर गेली आहे. या काळात चांदीच्या किंमतींमध्ये 2,550 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची नवीन किंमत 21.80 डॉलर प्रति औंसच्या नवीन शिखरवर पोहोचली आहे. त्याचबरोबर मुंबईत एक किलो चांदीची किंमत ही प्रति किलो 60043 रुपये झाली आहे.

सोन्याचे दर कधी घसरतील?
कमोडिटी एक्सपर्टस म्हणतात की सोन्याच्या किंमती तेव्हाच खाली येतील जेव्हा कोरोनाची लस बाजारात येईल आणि ती यशस्वीही होईल. याखेरीज भारत आणि चीन सोने खरेदी करत नसतील तराही सोन्याची किंमत कमी होऊ शकते. अशा वातावरणात सोने येथून दहा ग्रॅमसाठी 6000 रुपयांपर्यंत स्वस्त असू शकते. मात्र, याक्षणी ही किंमत प्रति दहा ग्रॅम 44 हजार रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता नाही.

सोने-चांदी खरेदी का महाग झाली
एचडीएफसी सिक्युरिटीचे कमोडिटी अ‍ॅनालिस्ट तपन पटेल म्हणतात की आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतींमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची खरेदी महाग झाली आहे. ते म्हणतात की, करोनो विषाणूच्या संसर्गाची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर सोन्यावरील सुरक्षित गुंतवणूकीची खरेदी वेगाने वाढली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment