टीम, HELLO महाराष्ट्र । ◆ किचनचा ओटा काळा कुळकुळीत हवा असेल तर लहान कापडावर गाेड तेलाचे पाच,सहा थेंब टाकुन ओटा पुसून घयावा. पांढरे डाग पडले असतील तर ते लगेच जातात व ओटा काळा हाेताे.
◆ काेकम सरबत जुने झाल्यास त्यात थाेडे पाणी व नारळ दुध घालावे ताजया काेकम सारा सारखे गुलाबी रंगाचे हाेते .(नेहमीप्रमाणे फाेडणी घालून)
◆ ओला नारळाचया वडया करतांना खवलेला नारळ, साखर, दूध सम प्रमाणात घेऊन मिकसरवरुन फिरवणे , कढईत शिजवणे, सगळ एकञ केल्याने खव्यासारखी चव वडीला येते .
◆ दिवाळीतले लाडु,बरफी,पेढे करंजी सारण उरले तर एकञ करून मिकसरवर फिरवणे व कणकेत भरून त्याच्या पाेळया कराव्यात सांजाेरी सारखया लागतात बाजुने तूप साेडावे.
◆ डाेशासाठी तांदुळ व डाळ भिजत घालतांना तयात एक छाेटा चमचा मेथीदाणेही भिजत घालावे डाेशाला चांगला रंग येताे व चव छान येते अगदी हॉटेलसारखी.