इंधन पेटलं! सलग पाचव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचा दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. भारतीय तेल मार्केटिंग कंपन्यांनी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. गुरूवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात ६० पैशांनी वाढ झाली असून पेट्रोलचे दर ७४ रूपये प्रती लिटरवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे डिझेलचे दर देखील ६० पैशांनी वाढले आहे. त्याचप्रमाणे गेल्या ५ दिवसांपासून पेट्रोल २.७४ रूपये प्रती लिटर आणि डिझेल २.८३ रूपये प्रती लिटर प्रमाणे वाढले आहेत. या इंधन दरवाढीमुळे येत्या काही दिवसांमध्ये देशात आणखी महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे दर ७४ रूपये प्रती लिटर आहे. डिझेल ७२.२२ रूपये प्रती लिटरने मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती एक दिवस घसरल्यानंतर पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशातील ४ महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्ली       पेट्रोल ७४.०० रूपये प्रती लिटर, डिझेल ७२.२२ रूपये प्रती लिटर
कोलकाता   पेट्रोल ७५.९४ रूपये प्रती लिटर, डिझेल ६८.१७ रूपये प्रती लिटर
मुंबई          पेट्रोल ८०.९८ रूपये प्रती लिटर, डिझेल ७०.९२ रूपये प्रती लिटर
चेन्नई        पेट्रोल ७७.२२ रूपये प्रती लिटर, डिझेल ७०.६४ रूपये प्रती लिटर

Leave a Comment