Toilate Cleaning | आपण आपल्या घराची स्वच्छता रोजच्या रोज करत असतो. अगदी फरशी पुसणे, कपाट साफ करणे त्याचप्रमाणे खिडक्या साफ करणे या गोष्टी आपण नेहमीच करत असतो. परंतु टॉयलेट किंवा बाथरूम हे केवळ आपण आठवड्यातनं दोन वेळा साफ करतो. आपण जर टॉयलेट वेळच्यावेळी साफ केले नाही, तर त्यावर हळूहळू पिवळे डाग पडू लागतात. आणि ते डाग सहसा निघत नाही. यामुळेच निरोगी आरोग्यासाठी टॉयलेट स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. अन्यथा अनेक रोग पसरण्याची भीती देखील निर्माण होते. आज आमच्या लेखातून आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्ही एकही पैसा खर्च न करता तुमचे टॉयलेट (Toilate Cleaning) घरच्या घरी अगदी स्वच्छ करू शकता.
अशाप्रकारे करा टॉयलेट स्वच्छ | Toilate Cleaning
तुम्ही जर आठवडाभर टॉयलेट स्वच्छ केले नाही, तर त्यावर अतिशय डाग निर्माण होतात. हे डाग सहज निघत नाही. तुमचे जर टॉयलेट स्वच्छ नसेल तर आजारांचा धोका देखील वाढू शकतो. परंतु अनेकवेळा आपण हे टॉयलेट साफ करण्यासाठी महागडे डिटर्जंट वापरतो. पण त्याचा काहीही फायदा होत नाही. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी टॉयलेट साफ करण्याचा एक अतिशय सोपा आणि स्वस्त मार्ग सांगणार आहोत. ते म्हणजे तुम्ही केवळ बर्फाने हे टॉयलेट साफ करू शकता.
तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये ठेवलेले बर्फाचे तुकडे घेऊन टॉयलेट साफ करू शकता. काही मिनिटातच तुमच्या टॉयलेटचा पॉट साफ होऊन जाईल. यासाठी तुम्ही तुमच्या फ्रीजमधील काही बर्फाचे तुकडे घ्या आणि त्या टॉयलेट पॉटमध्ये ठेवा. बर्फ खूप थंड असतो. त्यामुळे डाग काढणे सोपे जाते आणि याच्या मदतीने टॉयलेटमधील डाग निघून जाण्यास मदत होते.
हे बर्फाचे तुकडे टॉयलेटमध्ये टाकल्यावर अर्धा तास टॉयलेट वापरू नका ते तसेच सोडा तोपर्यंत हा बर्फ देखील वितळून जाईल आणि एकदा फ्लॅश करा. त्यामुळे टॉयलेटमध्ये आलेले सगळे पिवळे डाग निघून जातील. त्यांनतर टॉयलेटमध्ये थोडेसे क्लीनर टाकून ब्रशने स्वच्छ घासून घ्या.
हा बर्फ वितळतो तेव्हा बर्फाचे पाणी टॉयलेटमध्ये (Toilate Cleaning) साचलेली सगळी घाण काढून टाकतात. तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही घरच्या घरी नक्की हा उपाय ट्राय करून बघू शकता त्यामुळे आता तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये ट्रे रिकामा ठेवू नका. कारण हा बर्फ तुम्हाला तुमचे टॉयलेट साफ करण्यासाठी मदत करणार आहे. टॉयलेट वेगळ्या वेळी साफ केले नाही, तर तुमच्या आरोग्यासाठी याचा खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो.