हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताची दिग्गज बॉक्सिंग सुपरस्टार मेरी कोम यांनी टोकियो ऑलिम्पिकमधील आपला पहिला विजय मिळवला आहे. अतिशय खडतर असा हा सामना मेरीनं आपल्या अनुभवाच्या जोरावर आपल्या बाजूनं फिरवला. महिला बॉक्सिंगमधील पहिला सामना जिंकत मेरीनं पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
38 वर्षीय मेरी कोमने 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. मेरीने आज 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या प्रतिस्पर्ध्याच्या विरूद्ध 4- 1 ने विजय मिळवला. मिगुएलिना हर्नांडेझ पॅन अमेरिकन कांस्यपदक विजेती आहे. सुरुवाती पासूनच रोमांचक झालेल्या या सामन्यात
मेरी कोमने एक शानदार रणनीती दाखविली.
मेरी कोमने आक्रमक सुरुवात केली आणि 30-27 असा विजय मिळवित पहिल्या फेरीवर वर्चस्व राखले. ती दुसऱ्या फेरीत अधिक आक्रमक झाली, परंतु तिच्या प्रतिस्पर्धी मिगुएलिना हर्नांडेझने वापसी करत 29-28 अशी फेरी जिंकली. त्यानंतर मेरी कोमने तिचा बचाव मजबूत केला आणि पुढील तीन फेऱ्या 30-27, 28-29, 29-28, 30-28 आणि 29-28 अशा जिंकल्या.