Toll For Two Wheeler : दुचाकी गाड्यांच्या टोलबाबत गडकरींची मोठी घोषणा!! ट्विट करत म्हणाले की….

Toll For Two Wheeler gadkari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Toll For Two Wheeler । १५ जुलै २०२५ पासून, भारतातील दुचाकी वाहनांना सुद्धा टोल भरावा लागणार अशा प्रकारच्या बातम्या काल सर्वच माध्यमात वाऱ्यासारख्या पसरल्या. महामार्ग नेटवर्क राखण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी निधीची वाढती गरज भागवण्यासाठी सरकार असा निर्णय घेईल असेही ,म्हंटल जात होते. त्यामुळे दुचाकीस्वारांचे टेन्शन चांगलंच वाढलं. मात्र आता खुद्द केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या सर्व बातम्यांनंतर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्र सरकार कोणत्याही दुचाकी गाड्यांवर टोल लावणार नाही असं स्पष्ट करत सर्व बातम्या निरर्थक असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

दुचाकी वाहनांचा टोल पूर्णपणे माफ- Toll For Two Wheeler

नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल, दुचाकी वाहनांकडून टोल (Toll For Two Wheeler) वसूल करण्याच्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही आणि दुचाकी वाहनांचा टोल पूर्णपणे माफ राहील. सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवून खळबळ निर्माण करणे हे चांगल्या पत्रकारितेचे लक्षण नाही. मी त्याचा निषेध करतो. गडकरींच्या या ट्विट मुळे हे स्पष्ट झाले आहे की देशातील कोणत्याही दुचाकी वाहनांकडून टोल कर वसूल केला जाणार नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI) सुद्धा त्यांच्या X हँडलवर दुचाकी टोल बाबतच्या वृत्ताचे खंडन केलं. . NHAI ने म्हटले आहे की, “काही माध्यमांमध्ये असे वृत्त आले आहे की भारत सरकार दुचाकी वाहनांवर (Toll For Two Wheeler) वापरकर्ता शुल्क आकारण्याची योजना आखत आहे. NHAI स्पष्ट करू इच्छिते की असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. दुचाकी वाहनांसाठी टोल शुल्क आकारण्याची कोणतीही योजना नाही.

भारतात दुचाकी वाहनांकडून कोणत्याही प्रकारचा टोल कर वसूल केला जात नाही. देशात ४ चाकी आणि त्यापेक्षा जास्त चाके असलेल्या वाहनांना टोल कर भरावा लागतो. तर रुग्णवाहिका, अग्निशमन दल, संरक्षण सेवा वाहने, व्हीआयपी वाहने यासारख्या आपत्कालीन सेवांशी संबंधित वाहनांनाही टोल कर भरण्यापासून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.