Toll For Two Wheelers : आता दुचाकींनाही टोल भरावा लागणार? प्रवाशांना सर्वात मोठा झटका

Toll For Two Wheelers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Toll For Two Wheelers । आपल्या भारतात चारचाकी तसेच इतर मोठ्या गाडयांना टोल आकाराला जातो हे तर तुम्हाला माहीतच असेल, परंतु आता दुचाकी वाहनांना सुद्धा टोल भरावा लागू शकतो. १५ जुलै २०२५ पासून, भारतातील दुचाकी वाहनांना महामार्ग प्रवेश पॉईंट वर शुल्क भरण्यापासून सूट दिली जाणार नाही, असं बोललं जातंय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने केलेल्या धोरणातील हा एक महत्त्वपूर्ण बदल मानला जातोय. महामार्गांवर दुचाकी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पायाभूत सुविधांवर झीज झाली आहे आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या आव्हानांमध्ये भर पडली आहे, ज्यामुळे त्यांना टोल-पेमेंट ब्रॅकेटमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सरकारने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

दुचाकीस्वारांना मोठा आर्थिक फटका – Toll For Two Wheelers

अधिकाऱ्यांच्या मते, सर्व वाहनांसाठी एकप्रणाली टोल सिस्टीम लागू करणे हाच यामागचा उद्देश आहे. जड वाहनांच्या तुलनेत दुचाकी वाहनांसाठी टोल दर खूपच कमी असतील परंतु तरीही राष्ट्रीय महामार्ग नेटवर्क राखण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी निधीची वाढती गरज भागवण्यासाठी हा पैसा उपयोगी येईल. जर खरंच अंमलबजावणी झाली तर,प्रवाशांना FASTag दुचाकी वाहनांचे पालन करणे आवश्यक होईल. नवीन नियमानुसार, दुचाकी वाहनांना FASTag द्वारे टोल (Toll For Two Wheelers) भरावा लागेल. इतकेच नाही तर जो कोणी या नियमाचे उल्लंघन करेल त्याला २००० रुपये दंड भरावा लागेल असेही बोललं जातंय. काही कर्मचारी दुचाकीवरून लांबचा प्रवास करून कंपनीत पोहचत असतात, अशा कर्मचाऱ्यांना या नव्या टोल नियमाचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

यापूर्वी टोलच्या नियमात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या 15 ऑगस्टपासून वाहनचालकांना फास्टटॅगचा वार्षिक पास बनवता येणार आहे. हा पास वार्षिक 3 हजार रूपयांचा असेल अशी मोठी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) केली आहे. या वार्षिक पासच्या आधारे तुम्ही संपूर्ण वर्षभर किंवा २०० फेऱ्यांपर्यंत प्रवास करू शकता असं नितीन गडकरींनी सांगितलं होत. मात्र ३००० रुपयांचा हा Fastag फक्त राष्ट्रीय महामार्गावरच चालणार आहे.