पुण्याहून गावाकडे जाणार्‍यांची राष्ट्रीय महामार्गावर रिघ; गर्दी टाळण्यासाठी टोलमाफ होणार का?

0
64
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधि | आज संध्याकाळपासून पुण्याहून गावाकडे जाणार्‍यांची राष्ट्रीय महामार्गावर अक्षरशः रिघ लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी सर्व खाजगी कार्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने सर्वजणांनी गावाकडचा रस्ता धरला आहे. यामुळे आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून शासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोलनाक्यांना बंद ठेवण्याचे आदेश देणार का असा सवाल आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागांतून अनेकजण नोकरिनिमित्त पुण्यात स्थायिक आहेत. राज्यात सर्वाधिक कोरोनारुग्न पुण्यात सापडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.आशात आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व खाजगी कार्यालयांना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अनेकजण शुक्रवारी आॅफिसवरुन आल्यानंतर गावाकडे निघाले आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून टोलनाक्यांवर वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या आहेत. एका वाहनाला टोलपर्यंत येण्याकरता किमान २० मिनिटे लागत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला असून सरकार टोलनाके बंद ठेवण्याचे आदेश देणार का असा सवाल आहे.

तसेच टोलनाक्यावर कॅशमध्ये पैसे द्यावे लागत असल्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची जास्त भिती आहे. वेगवेगळ्या भागांतून आलेल्या लोकांच्या हातातून आलेले पैशांचे मोठ्या प्रमाणावर हस्तांतरण होत असल्याने शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. टोलनाक्यावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्याही आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

दरम्यान, देशात आत्तापर्यंत एकुण २५२ कोरोनारुग्ण पोझिटिव्ह सापडले आहेत. यातील ५२ रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यातील सर्वाधिक रुग्न पुणे – पिंपरि चिंचवड मध्ये सापडले आहेत. देश सध्या कोरोनाच्या दुसर्‍या स्टेजमध्ये आहे. मात्र योग्य ती खबरदारी घेतली नाही तर आपल्याला तिसर्‍या स्टेजमध्ये जाण्यास जास्त वेळ लागणार नाही. तेव्हा सर्वांना आरोग्याची काळजी घेण्याचे आणि घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here