Tomato Cultivation | ‘या’ टिप्सचा वापर करून करा टोमॅटोच्या लागवड, कमी वेळात होईल लाखोंची कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tomato Cultivation | आजकाल शेतकरी शेतामध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करायला लागलेले आहेत. भारतात टोमॅटोची लागवड देखील भारतात मोठ्या प्रमाणात होते. टोमॅटोची लागवड करून अगदी कमी वेळात लाखोंची कमाई शेतकरी करतात. भारतीय शेतकऱ्यांना टोमॅटोच्या लागवडीतून प्रचंड नफा मिळतो. जर तुम्हाला देखील टोमॅटोची शेती (Tomato Cultivation) करायची असेल. तर त्यासाठी आम्ही काही आज उत्तम टिप्स सांगणार आहोत. त्याचा वापर करून तुम्ही चांगले लागवड करू शकता. टोमॅटोची लागवड उत्तर भारतात वर्षातून दोनदा केली जाते.

चांगले पीक कशामुळे मिळते? | Tomato Cultivation

टोमॅटोचे चांगले पीक घेण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटोचे बियाणे शेतात न लावता रोपवाटिकेत तयार करावे.रोपवाटिकेत रोपे तयार झाल्यावर एक महिन्यानंतर त्यांची शेतात पुनर्लावणी करावी लागते. टोमॅटोची लागवड करताना लक्षात ठेवा की झाडे खूप खोलवर लावू नयेत. याशिवाय हिवाळ्यात टोमॅटो पिकाला ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

शेतीसाठी योग्य माती आणि हवामान

चिकणमाती आणि काळी माती टोमॅटोच्या लागवडीसाठी उत्तम मानली जाते. तुम्ही कोणत्याही जमिनीत अगदी सहज टोमॅटोची लागवड करू शकता. याशिवाय 12 ते 21 अंश तापमान टोमॅटोच्या लागवडीसाठी उत्तम मानले जाते.

प्रत्यारोपण

रोपांची लागवड 20 ते 25 दिवसांची झाल्यावरच करावी.
झाडे फक्त 1 सेमी अंतरावर लावावीत.

खत

शेतात हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत टाकावे.
याशिवाय रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणाच्या आधारेच करावा.

टोमॅटो शेतीतून नफा | Tomato Cultivation

जर तुम्ही 1 एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली तर तुम्हाला एका वर्षात सुमारे 15 लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळू शकते