आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ‘डकवर्थ-लुईस’मधील लुईस यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रसिद्ध ‘डकवर्थ-लुईस’ नियम देणाऱ्यांपैकी गणिततज्ज्ञ टोनी लुईस यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) बुधवारी याबाबतची माहिती दिली. क्रिकेटला डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धत देणाऱ्या समितीचे ते सदस्य होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये डकवर्थ-लुईस यांची हि पद्धत वापरली जाते.

१९९२ वर्ल्ड कपच्या सिडनी येथे झालेल्या उपांत्य सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतर DLSचे सूत्र तयार करण्यात आले. इंग्लंडला पराभूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला १३ चेंडूंत २२ धावांची आवश्यकता होती. पावसाच्या व्यत्ययानंतर एका चेंडूवर २१ धावा करणे अशक्य होते. त्यानंतर काही काळातच हि पध्द्ध्त वापरण्यात आली.

टोनी यांनी सहकारी गणिततज्ज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासमवेत डकवर्थ-लुईस पद्धतीचा ११९७ मध्ये शोध लावला. ICC ने १९९९ मध्ये तो अधिकृतपणे स्वीकारला. २०१४ मध्ये डकवर्थ-लुईस-स्टर्न सूत्रानुसार या नियमाचं नाव बदलण्यात आलं. मर्यादित षटकांच्या सामन्यात पाऊस पडला तर या पद्धतीचा वापर केला जातो.

DLS नियमावर बर्‍याचदा टीका करण्यात येते. ऑस्ट्रेलियन आकडेवारीतज्ज्ञ स्टीव्हन स्टर्न यांनी २०१४ मध्ये ‘स्कोअरिंग रेट’च्या आधारावर नियमात सुधारणा केली. २०१४ मध्ये नाव बदलल्यानंतरही गणिताचे हे सूत्र जगभरात पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांमध्ये वापरले गेले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

Leave a Comment