Top 10 Affordable Localities In pune: पुण्यात घर शोधताय? ‘या’ 10 भागांमध्ये स्वस्तात मिळेल घर आणि चांगली लाइफस्टाइल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Top 10 Affordable Localities In pune: पुणे हे महाराष्ट्रातील शिक्षण, उद्योग आणि आयटीचं महत्त्वाचं केंद्र आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी, नोकरी करणारे तरुण आणि व्यवसायिक पुण्यात स्थायिक होण्यासाठी येत असतात. मात्र, पुण्याची झपाट्याने होत असलेली वाढ आणि वाढती मागणी यामुळे अनेक भागांत घरांची किंमत गगनाला भिडलेली आहे. तरीसुद्धा, अजूनही असे काही भाग आहेत जिथे कमी बजेटमध्ये चांगले घर, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि राहणीमान मिळू शकतं. चला तर मग जाणून घेऊया पुण्यातील १० स्वस्त आणि योग्य एरियाज, जे तुमच्या स्वप्नातील घरासाठी योग्य ठरू शकतात:

  1. कात्रज

विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरदारांसाठी परवडणारा आणि शांत भाग. कात्रज हा NH4 जवळ असून शिक्षण संस्था, राजीव गांधी प्राणी उद्यान आणि तलाव यासाठी प्रसिद्ध आहे. येथे बजेटमध्ये घरं सहज मिळतात.

  1. हिंजवडी

पुण्याचं प्रमुख IT हब. येथे अनेक जण शेअरिंगमध्ये किंवा पीजीमध्ये राहतात. IT प्रोफेशनल्स आणि विद्यार्थ्यांसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांमुळे इथे रोज नोकरीच्या संधी मिळतात.

  1. धनकवडी

राष्ट्रीय महामार्गाजवळ वसलेला हा परिसर शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक कॉलेजेस आणि भाड्याने घरं स्वस्तात उपलब्ध आहेत.

  1. वारजे

मुठा नदीच्या काठावर वसलेला, शहराच्या मध्यभागी असलेला वारजे परिसर शांत, सुंदर आणि परवडणारा आहे. येथे अनेक नवीन प्रोजेक्ट्सही सुरू आहेत.

  1. भोसरी

पुण्याचं औद्योगिक हृदय. टाटा मोटर्ससारख्या कंपन्या इथे आहेत. त्यामुळे नोकरीसाठी आलेल्या लोकांसाठी हा परिसर स्वस्त आणि योग्य आहे.

  1. भूगाव

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेजवळ असलेला हा परिसर निसर्गाच्या सान्निध्यात आणि मोकळ्या जागेच्या शोधात असणाऱ्यांसाठी परवडणारा पर्याय आहे.

  1. लोहेगाव

पुणे विमानतळाजवळ असलेला हा भाग चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी ओळखला जातो. इथे घरं स्वस्तात मिळतात आणि सार्वजनिक वाहतुकीची उत्तम सोय आहे.

  1. वाघोली

पूर्व पुण्यातील सर्वात वेगाने विकसित होणारा भाग. पुणे-अहमदनगर महामार्गाशी जोडलेला असून येथे अनेक नवीन टाउनशिप्स सुरू आहेत.

  1. खराडी

ईस्टर्न आयटी हब म्हणून ओळखले जाणारे खराडी, उच्च दर्जाच्या सोयीसुविधा असूनही अजूनही बजेटमध्ये घरं मिळतात. खास करून सिंगल्स आणि तरुण जोडप्यांसाठी हा भाग आदर्श आहे.

  1. चाकण

औद्योगिक वसाहतींनी समृद्ध असलेला हा परिसर स्वस्त घरांच्या शोधात असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. नाशिक-पुणे महामार्गावर असल्यामुळे येथून प्रवास करणेही सोपे आहे.

जर तुम्ही पुण्यात नवे घर खरेदी किंवा भाड्याने घेण्याचा विचार करत असाल, तर हे भाग तुमच्या बजेटमध्ये फिट बसतील. शिवाय, या भागांमध्ये सतत विकास होत असल्यामुळे येथील मालमत्तेची किंमत भविष्यात वाढण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजेच, हे स्वस्तात गुंतवणुकीचं सोनं ठरू शकतं!