हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : 2021 हे वर्ष चित्रपट क्षेत्रासाठी कठीण गेले. मात्र वेबसिरिजने लोकांची भुक भागवली. 2021 या वर्षी भारतातील सर्वात लोकप्रिय टॉप 10 वेब सिरीजची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कोणकोणत्या वेब सिरीजचा समावेश आहे चला पाहूया….
1 अॅस्पिरीटस
या यादीमध्ये सर्वात पहिला क्रमांक लागतो तो अॅस्पिरीटस या वेब सिरींजचा. या सिरीजमध्ये UPSCची तयारी करणाऱ्या तीन मित्रांची कहाणी दाखवण्यात आलेली आहे. यासाठी त्यांना कोणत्या अडचणी येतात, त्यातून ते कसा मार्ग काढतात हे दाखवण्यात आले आहे.
2. धिंडोरा.
या यादीमध्ये दुसरा क्रमांक लागतो तो धिंडोरा या वेब सिरीजचा. या वेब सिरीजची कथा धिंडोरा भुवन या व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाभोवती फिरताना दिसते.
3 द फॅमिली मॅन
या लिस्टमध्ये द फॅमिली मॅन या सिरीजचा तिसरा क्रमांक लागतो. या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी प्रमुख भूमिकेत आहे. या सिरीजमध्ये मनोज बाजपेयी राष्ट्रीय तपास संस्थेत कामाला आहे. तो आपली गुप्त नोकरी आणि घर कशाप्रकारे सांभाळतो हे दाखवण्यात आले आहे. या सीरिजचे आतपर्यंत 2 सीजन आले आहेत.
4 द लास्ट हवर
या यादीत द लास्ट हवर या सिरीजचा चौथा क्रमांक लागतो. यामध्ये प्रेम आणि आपले कर्त्यव्य यांचे कॉमबिनेशन दाखवले आहे.
5 सनफ्लॉवर
या यादीत सनफ्लॉवर या सिरीजचा पाचवा नंबर लागतो. या सिरीजमध्ये सनफ्लॉवर नावाच्या गृहनिर्माण संस्थेमध्ये एका विचित्र हत्येचे रहस्य दाखवले आहे.
6 कँडी
या यादीत कँडी या वेब सिरीजचा सहावा नंबर लागतो. या सिरीजमध्ये एका विद्यार्थ्याचा खून झालेला असतो. या खुनाचा तपास पोलीस रत्ना संखावर आणि या विद्यार्थ्याचे शिक्षक करतात. यामध्ये कोणकोणत्या रहस्यांचा उलघडा होतो ते दाखवण्यात आले आहे.
7 रे
या यादीत रे या वेब सिरीजचा सातवा नंबर लागतो. या वेब सिरीजमध्ये प्रसिद्ध लेखक सत्यजित रे यांनी लिहिलेल्या चार लघुकथा यामध्ये साकारण्यात आल्या आहेत.
8 ग्रहण
या यादीत ग्रहण या वेब सिरीजचा आठवा नंबर लागतो. या वेब सिरीजची कथा IPS अधिकारी अमृता सिंगने भूतकाळाला तिच्या वर्तमानाशी जोडणारे एक रहस्य उलघडले आहे.
9 नोव्हेंबर स्टोरी
या यादीत नोव्हेंबर स्टोरी या सिरीजचा नववा नंबर लागतो. अल्झायमरने ग्रस्त एक ख्यातनाम गुन्हेगारी कादंबरीकार एका खुनाच्या ठिकाणी सापडतो आणि या प्रकरणात अडकतो. यामध्ये त्याला वाचवणाऱ्या त्याच्या मुलीची कथा दाखवण्यात आली आहे.
10 मुंबई डायरी 26/11
या यादीत मुंबई डायरी 26/11 या सिरीजचा दहावा नंबर लागतो. या सिरीजमध्ये 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याबद्दल दाखवण्यात आले आहे.