हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उन्हाळ्याच्या झळांनी संपूर्ण महाराष्ट्र होरपळत असताना, थंडगार पाण्यात मनसोक्त डुबकी घेण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर वॉटर पार्क हा उत्तम पर्याय ठरतो. महाराष्ट्रात काही प्रसिद्ध अन अत्याधुनिक वॉटर पार्क्स आहेत, जे पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिले आहेत. या वॉटर पार्क्समध्ये जलक्रीडा, स्लाइड्स आणि विविध पाण्याच्या राइड्सचा अनुभव घेता येतो, ज्यामुळे उन्हाळ्यात थंडगार पाण्यात आनंद घेण्यासाठी हि ठिकाणे लोकप्रिय आहेत. तसेच हि सर्व ठिकाणी कुटुंबांसोबत आणि मित्रांसोबत मजा करण्यासाठी आदर्श आहेत. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 5 वॉटर पार्क्स.
अॅड्लॅब्स इमॅजिका वॉटर पार्क –
मुंबई आणि पुणे यांच्यामधील खोपोली येथे वसलेला इमॅजिका वॉटर पार्क हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. या पार्कमध्ये लूपिंग रॅपिड्स, स्विरल व व्हर्लपूल स्लाइड्स यांसारख्या रोमांचक राईड्स आहेत. कुटुंबासाठी सुरक्षित अन स्वच्छ वातावरण देणाऱ्या या पार्कमध्ये दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात.
वॉटर किंगडम –
एशियातील (गोराई, मुंबई) सर्वात मोठ्या वॉटर पार्क्सपैकी एक असलेले वॉटर किंगडम हे 26 एकर क्षेत्रफळात पसरलेले आहे. वेव्ह पूल, झिग-झाग राईड्स आणि मल्टीलेव्हल स्लाइड्ससह येथे एकूण 30 हून अधिक खेळ आहेत. मुले, तरुण आणि वयोवृद्ध सर्वांसाठी हे ठिकाण आकर्षणाचं केंद्र ठरतं.
ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क –
अमरावतीमध्ये सर्वात लोकप्रिय वॉटर पार्क म्हणून ओळखले जाणारे ड्रीम वर्ल्ड हे बडनेरा रोडवर वसले आहे. येथील “ड्रॅगन राईड”, “रॅपिड फ्लो” आणि “रेन डान्स झोन” पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरले आहेत. अमरावतीसह परिसरातील जिल्ह्यांतून येथे पर्यटक दररोज गर्दी करतात.
शंग्रीला वॉटर पार्क –
शहापूरजवळ असलेला शंग्रीला वॉटर पार्क शांत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेला आहे. येथील वेव्ह पूल आणि किड्स स्प्लॅश झोन विशेष प्रसिद्ध आहे. येथे हॉटेल आणि रिसॉर्टचीही सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे संपूर्ण दिवसाचा प्लॅन येथे करता येतो.
कृष्णा वॉटर अॅण्ड अॅम्युझमेंट पार्क –
पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याजवळील हा वॉटर पार्क स्थानिक आणि बाहेरील पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. येथे वॉटर स्लाईड्ससह रोलर कोस्टर आणि ट्रेन राईड्ससारखे अॅम्युझमेंट झोनही आहेत. गर्मीपासून थोडीशी सुटका हवी असेल, तर हे वॉटर पार्क्स एकदम परिपूर्ण पर्याय आहेत.




