लग्नानंतर आपल्या साथीदाराला धोका देण्यात ‘हा’ देश आहे सगळ्यात पुढे; जाणून घ्या काय आहे खुलासा

0
86
Extra marital affairs
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जोडीदाराची फसवणूक करण्याच्या बाबतीत आयर्लंडमधील लोक संपूर्ण जगामध्ये आघाडीवर आहेत. कॅनडामधील विवाहित डेटिंग साइटच्या सर्वेक्षणात हे उघड झाले आहे. अभ्यासानुसार, आयर्लंडमधील दर पाचपैकी एक (20 टक्के) जण त्याच्या जीवन साथीदाराला फसवतो. फसवणूक करण्याच्या बाबतीत जर्मनी दुसर्‍या क्रमांकावर आहे. इथल्या 13 टक्के लोकांनी कबूल केले की, ते दररोज आपल्या पार्टनरची फसवणूक करतात. या जागतिक अभ्यासात कोलंबिया तिसऱ्या (8%), फ्रान्स चौथ्या (6%) आणि यूके पाचव्या (5%) क्रमांकावर आहे.

या विवाहबाह्य डेटिंग अ‍ॅपच्या सर्वेक्षणात, बहुतेक लोकांनी हे मान्य केले की प्रेम प्रकरणांबद्दल जाणून घेतल्यानंतरही ते आपल्या जोडीदारास क्षमा करतील. अभ्यासामध्ये, बहुतेक पुरुष आपल्या जोडीदारांच्या फसवणूकीबद्दल समजले असता त्यांना क्षमा करण्यास तयार होतात. अभ्यासाच्या आकडेवारीनुसार, फसवणूक झाल्यानंतर बहुतेक स्त्रिया पूर्वीप्रमाणे आंधळेपणाने आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवत नाहीत. मागील फसवणुकीसाठी 80% पुरुष आणि 85% महिलांना त्यांच्या जोडीदारांनी क्षमा केले होते.

सर्वेक्षणात जेव्हा आपण आपल्या जोडीदारास त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल क्षमा करणार की नाही असे विचारले असता – 86 टक्के पुरुषांनी, ‘ होय’ हे उत्तर दिले. तर 82 टक्के महिलांनी, ‘नाही ‘ असे उत्तर दिले. महिला आणि पुरुषांमधील वैचारिक फरकांवर मानसशास्त्रज्ञांची भिन्न मते आहेत. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, जेव्हा जेव्हा एखादे प्रेम प्रकरण आढळते तेव्हा पुरुष आपल्या जोडीदाराच्या शारीरिक आसक्तीकडे अधिक लक्ष देतात. तर महिलांना आपल्या जोडीदाराची दुसर्‍या स्त्रीशी किती भावनिक आस असते हे जाणून घेण्यात अधिक रस असतो. ग्लोबल स्टडी डेटिंग साइटने 3000 सभासदांवर हे अभ्यास सर्वेक्षण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here