Top political personalities of the 2024 | 2024 मध्ये देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. यामध्ये काही नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांच्या काही निर्णयामुळे तसेच काही वक्तव्यांमुळे देशाचे राजकारणाने चांगलीच उभारी घेतलेली आहे. नक्कीच सगळ्या नागरिकांना हे नेते आणि राजकारण लक्षात राहतील. आता आपण 2024 मधील देशातील अशा काही राजकीय व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेणार आहोत. जे नेहमी चर्चेत राहिलेले आहेत. तसेच त्यांनी राजकारणाची बाजी पलटवलेली आहे.
नरेंद्र मोदी | Top political personalities of the 2024
लोकसभा निवडणुक 2024 मध्ये NDA विजयी झाले आहे. आणि नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे. 2024 मध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ज्यामुळे ते नेहमी चर्चेत राहिलेले आहेत. देशाचे पंतप्रधान होण्यासोबतच त्यांच्यातील मानवता तसेच सोशल मीडिया पोस्टद्वारे ते नेहमीच चर्चेचा विषय बनले आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी घेतलेल्या अनेक नियम देखील चर्चेत राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झालेले आहेत.
नितीश कुमार
2024 मध्ये बिहार राज्यात एनडीए सरकारने आलेले आहे आणि नितीश कुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. नितीश कुमार हे बिहार राज्याचे 9 व्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. मुख्यमंत्री होण्याचा नितीश कुमार यांनी एक खूप मोठा विक्रम रचलेला आहे. 2024 मधील राजकारणातील एक खूप मोठे व्यक्तिमत्त्व म्हणून यांच्याकडे पाहिले जाते.
देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदावर निवडून आलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस गट मिळून महायुती स्थापन केली. त्यांनी “मी पुन्हा येईल” त्यांचे हे वक्तव्य खरे केलेले आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे नाव आणि पक्ष पुन्हा एकदा वरचढ बनवलेला आहे. उपमुख्यमंत्री पदावर असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यासाठी ते नेहमीच चर्चेत आलेले आहेत.
एकनाथ शिंदे
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2024 मध्ये उपमुख्यमंत्री झालेले आहेत. मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी राज्यातील जनतेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. त्यातीलच महायुती सरकारची माझी लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरलेली आहे. या योजनेमुळेच महायुती सरकार निवडून आल्याचा दावा अनेक लोक करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून काही आमदारांसोबत एक्झिट घेतली. आणि भाजप सोबत त्यांनी महायुती करून एक नवीन इतिहास घडवलेला आहे.