Torna Fort : हिंदवी स्वराज्यातील पहिला किल्ला; वयाच्या 16 व्या वर्षी शिवरायांनी जिंकला होता ‘हा’ गिरिदुर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Torna Fort) आपल्या महाराष्ट्राला गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. राज्यभरात अनेक गडकिल्ले आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देतात. आज आपण हिंदवी स्वराज्यातील पहिला किल्ला अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जिंकलेल्या पहिल्या किल्ल्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. हा किल्ला म्हणजे गिरिदुर्ग तोरणा. जो आज प्रचंडगड म्हणून ओळखला जातो.

कुठे आहे? (Torna Fort)

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात तोरणा हा किल्ला स्थित आहे. जो महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा अत्यंत महत्वाचा साक्षीदार मानला जातो. कारण, तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या वयाच्या १६ व्या वर्षी जिंकलेला पहिला किल्ला आहे. त्यावेळी शिवरायांसोबत त्यांच्याच वयाचे मावळे होते. त्यामुळे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांमध्ये तोरणा किल्ल्याचे विशेष स्थान आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगामध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे १४०० मीटर उंचीवर हा किल्ला आहे. असा हा तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे.

प्रमुख आकर्षण

तोरणा किल्ला सर करायला अनेक शिवभक्त आणि ट्रेकर्स येत असतात. (Torna Fort) अशा पर्यटकांसाठी तोरणा किल्ल्यावरून दिसणारे इतर किल्ले आकर्षण ठरते. यामध्ये राजगड किल्ला, सिंहगड किल्ला, रायगड किल्ला, पुरंदर किल्ला, लिंगाणा किल्ला या किल्ल्यांचा समावेश आहे. तोरणा किल्ल्याचे आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे ऐतिहासिक असा बिनी दरवाजा.

धनलक्ष्मी तोरणा

अनेक इतिहास संशोधक सांगतात की, तोरणा किल्ला हा त्या काळी महाराजांसाठी ‘धनलक्ष्मी’ ठरला होता. कारण या किल्ल्यावर गुप्तधनाच्या बऱ्याच राशी सापडल्या होत्या, असं उल्लेख आहे. (Torna Fort) इथे सापडलेले धन हे राजगड किल्ल्याच्या निर्मीतीसाठी उपयोगी पडल्याचे इतिहास संशोधक सांगतात.