हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक कोणत्याही कंपनीत आर्थिक गुंतवणूक (financial investment) करतात त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. गेल्या काही दिवसापासून फक्त 6 – 7 दिवसांत भकळ नफा मिळवून देणाऱ्या टोरेस कंपनीने (Torres Company Scam ) अचानक आपला गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांची मोठी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. कंपनीने जवळपास 3 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा अंदाज असून, यामुळे संतप्त गुंतवणूकदारांनी दादर आणि नवी मुंबईतील कार्यालयांसमोर मोठी गर्दी केली. काही ठिकाणी गुतंवणूकदारानी मोठी तोडफोड केलेली आहे. तर चला या बातमीबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टोरेस कंपनी बंद (Torres Company Scam) –
टोरेस कंपनीने मुंबईत वेगवेगळ्या भागात आपली कार्यालये उघडली होती. अवघ्या सहा ते सात दिवसांत मोठ्या रिटर्न्स मिळवून देण्याच्या आमिषामुळे अनेकांनी या कंपनीत लाखो रुपये गुंतवले. पण गेल्या आठवड्यात कंपनीने अचानक आपली सर्व कार्यालये बंद केली. गुंतवणूकदारांना 8 जानेवारीपर्यंत पैसे परत मिळतील, असे सांगण्यात आले होते . मात्र हे गुंतवलेले पैसे परत न मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांनी दादर आणि नवी मुंबईतील कार्यालयासमोर मोठी गर्दी केली .
पाच व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल –
या फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या पाच प्रमुख व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्का, तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर, तानिया कॅसातोवा आणि व्हॅलेंटिना कुमार या व्यक्तींचा समावेश आहे.
दागिन्यांच्या बनावट विक्रीचा व्यवसाय –
टोरेस कंपनीने (Torres Company Scam) सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या बनावट विक्रीचा व्यवसाय दाखवून गुंतवणूकदारांना फसवले. कंपनीने कमी रकमेच्या गुंतवणुकीवर 6 टक्के व्याज, तर जास्त रकमेवर 11 टक्के व्याज देण्याचे आश्वासन दिले होते. सुरुवातीला कंपनीने गुंतवणूकदारांना गाड्या, घरे आणि दागिन्यांचा परतावा दिला, त्यामुळे अनेकांनी अधिकाधिक रक्कम गुंतवली.
सर्व गुतंवणूकदारांची चिंता वाढली –
आता आपण केलेली गुंतवणूक बुडाली , त्यामुळे गुतंवणूकदाराची चिंता वाढली . यासाठीच गुंतवणूकदारांनी पोलिस आणि प्रशासनाला कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक झाली नाही , तर याचे परिणाम वेगळे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आर्थिक फसवणुकीमुळे सर्व गुतंवणूकदारांची चिंता वाढली आहे.