परीक्षेला आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
औरंगाबाद – संबंध ठेवल्यास आपल्या लग्नात तुझी आई विरोध करणार नाही, असे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
16 वर्षाच्या तरुणीसोबत संतोष यशवंत सरनागट (20, रा. मुकुंदवाडी) यांने मैत्री केली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यास मुलीच्या आईचा विरोध होता. त्यामुळे मुलीचे कुटुंब मुकुंदवाडी सोडून दुसरीकडे राहण्यास गेले. तेथून ते मुंबईला स्थलांतरित झाले. मुलीची 8 ते 11 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होती. त्यासाठी ती औरंगाबादेत आली. संतोषने ही संधी साधली, आणि मुलीला स्वतःच्या घरात नेऊन तीनदा अत्याचार केले.
मुंबईला गेल्यानंतर मुलगी संतोष सोबत मोबाईलवर प्रेमाच्या गप्पा मारू लागली. त्याची कुणकुण आईला लागली. आईने औरंगाबाद गाठत मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी या प्रकरणी पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, याप्रकरणी व्ही. एम. गुळवे पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment