कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८६ वर पोहोचली आहे. अशात आत कराडकरांना दिलासा देणारी बातमी आली आहे. कराड तालुक्यातील तब्ब्ल १५ कोरोनाग्रस्त ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये कृष्ण हॉस्पिटल मधून आज ११ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला तर कराड उपजिल्हा रुग्णालयातून ४ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाला हरवण्यात तालुक्यातील १५ जणांना यश आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सोमवारी कराड तालुक्यातील आणखी 15 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने तालुक्यात आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या नागरिकांमध्ये आगाशिवनगर येथील 25 वर्षीय युवक, 27 वर्षीय युवक व 65 वर्षीय वृद्ध गृहस्थ तसेच वनवासमाची येथील 32 वर्षीय महिला, 38 वर्षीय युवक व 13 वर्षीय मुलगा, मलकापूर येथील 54 वर्षीय पुरुष, कापील येथील 11 वर्षीय मुलगा, 49 वर्षीय गृहस्थ, कामेरी येथील 48 वर्षीय पुरुष, मिरेवाडी-फलटण येथील 28 वर्षीय युवक आदींचा समावेश आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील चार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. यामध्ये वनवासमाची 3 तर आगाशिवनगर नगर 1 रुग्णांचा समावेश आहे. असे एकूण 15 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचे डॉक्टर्स, नर्स यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले असून पुष्पगुच्छ देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसल,े डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तहसीलदार अमरदीपक वाकडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/705260063637732/
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.