आत्ता पर्यंत ४२ पोलीस अधिकारी व ४१४ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३ व पुणे येथील १ अशा ४ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. आत्तापर्यंत ४२ पोलीस अधिकारी व ४१४ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. लॉक डाऊन मध्ये थोडीशी शिथिलता म्हणजे लाँक डाऊन संपले असे नाही. उलट या काळात सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहनही देशमुख यांनी नागरिकांना केले आहे.

दरम्यान, ४ मे पासून राज्यातील अनेक भागांतील लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. काही भागांतील जीवनावश्यक सेवा सोडून इतर दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पोलिसांसमोरील आव्हान यामुळे आणखी वाढले असून पोलीस प्रशासन जीवावर उदार होऊन आपले काम पार पडत आहे.

Leave a Comment