Tourism : वेगवेगळे देश फिरायला , तिथली संस्कृती जाणून घ्यायला तुम्हाला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारतीय पर्यटकांसाठी सौदी अरेबिया खास ऑफर देत आहे. सौदी अरेबिया कडून भारतीय पर्यटकांची (Tourism) संख्या वाढवण्यासाठी ही खास ऑफर सुरु केली आहे. ही ऑफर नक्की काय आहे चला जाणून घेऊया …
सौदीने व्हिसाच्या नियमांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला असून, सौदी अरेबिया भारतीय नागरिकांना 96 तासांचा मोफत व्हिसा देत आहे. दोन्ही देशांमधील प्रवासाच्या संधी आणि पर्यटन (Tourism) वाढवण्यासाठी ही ऑफर एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
96 तासांचा फ्री व्हिसा (Tourism)
अलीकडेच सौदी टुरिझम अथॉरिटीचे एशिया पॅसिफिक चेअरमन अलहसन अल्दाबाग यांनी एका संवादादरम्यान याबद्दल सांगितले. अल्दाबागचे हे पाऊल सौदी अरेबियाच्या वाढत्या पर्यटन क्षेत्रात (Tourism) भारताची महत्त्वाची भूमिका दर्शवते. ओव्हरस्टे करणाऱ्या ग्राहकांना 96 तासांचा व्हिसा दिला जाईल.
या कार्यक्रमांतर्गत, सौदी एअरलाइन्स किंवा खाजगी सौदी कमी किमतीच्या एअरलाइन फ्लायनासमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना 96 तासांचा व्हिसा मोफत दिला जाईल. एवढेच नाही तर यूके, यूएस, शेंजेन व्हिसा धारण केलेल्या प्रवाशांना (Tourism) ई-व्हिसा किंवा हा व्हिसा ऑन अरायव्हल मिळू शकतो.
हे देश देत आहेत मोफत व्हिसा
मलेशिया, श्रीलंका आणि थायलंड भारतीयांना मोफत व्हिसा देत आहेत. याशिवाय (Tourism) थायलंड, श्रीलंका, भूतान हे देश मोफत व्हिसा देत आहेत.