व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पर्यटन राजधानीच्या सौंदर्यात पडणार भर ! वेरुळात साकारत आहे देशातील सर्वात उंच ‘शिवलिंगाचे मंदिर’

औरगाबाद – महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असेलेले औरगाबाद शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथे देश-विदेशातून असंख्य पर्यटक आपल्या वास्तूंना भेट देण्यासाठी येतात. अशातच पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पर्यटनासाठी औरंगाबादमध्ये येणाऱ्या उत्साही पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांचे लक्ष वेधून घेणारे आणखी एक मंदिर वेरूळमध्ये साकारण्यात येत आहे. यामुळे पर्यटन राजधानीच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.

जगप्रसिद्ध वेरूळ येथे देशातील सर्वात जास्त उंचीचे शिवलिंगाच्या आकारचे मंदिर बांधले जात आहे.या मंदिराच्या गाभाऱ्यात एकाच ठिकाणी देशातील 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींची प्रतिष्ठापना होणार आहे.

उज्जैन येथे या प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरु आहे.एकाच वेळी 12 पिंडींना प्रदक्षिणा घालण्यासाठी विशेष मार्गही तायर करण्यात येणार आहे.