Tourist Places in Mumbai : मुलांना फिरायला न्यायचंय? तर मुंबईतील ‘या’ ठिकाणी आखा उन्हाळी सुट्टीचा बेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tourist Places in Mumbai) सध्या मुलांच्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी सुरु आहे. त्यामुळे दिवसभर मुलं एकतर व्हिडीओ गेम खेळतात, टीव्ही पाहतात नाहीतर काय मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतात. घराबाहेर खेळायचं म्हटलं तर उन्हामुळे हैराण होतात. त्यामुळे घरात बसून बसून मूळ कंटाळून जातात. अशी तर आपल्या मुलांची उन्हाळी सुट्टी वाया जातेय, हे पालकांच्याही लक्षात येत असत. पण फिरायला जायचं तर कुठे जायचं? असा प्रश्न सगळ्याच पालकांना पडलेला असतो.

मुंबईकरांची पहिली पसंती कायम राणीची बाग आणि वॉटर पार्क असते. पण कितीवेळा त्याच त्याच ठिकाणी फिरायला जाणार ना? मुलंही दुसरीकडे जाण्याचा हट्ट करतात. (Tourist Places in Mumbai) तर तुम्हीही मुलांना घेऊन मुंबईतल्या मुंबईत फिरायचा प्लॅन करत असाल तर डोन्ट वरी. आज आपण मुंबईतील काही शॉर्ट पिकनिक स्पॉटविषयी माहिती घेणार आहोत. जिथे मुलांना नेता येईल आणि मुलं एन्जॉय करू शकतील. इतकंच काय तर या स्पॉट्सवर गेल्यानंतर मुलांचाचं नव्हे तर तुमचाही पाय निघणार नाही.

1. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

मुंबईकरांनो, तुम्हाला बोरीवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्क तर माहित असेलच. (Tourist Places in Mumbai) तर या उन्हाळी सुट्टीत मुलांना घेऊन मस्त नॅशनल पार्कला जा. नुसतं तेव्हढंच नाही तर वनराणी जंगल सफारीचा आनंद घ्या. इथे एका टॉयट्रेनमधून जंगल सफारी घडवली जाते. या सफरीत मस्त सैरसपाटा होतो आणि काही प्राणीदेखील दृष्टीस पडतात. मुलांना नक्की आवडेल.

2. छोटा काश्मिर

मुंबईतील गोरेगाव येथे असलेले छोटे काश्मिर हे ठिकाण लहान मुलांना फिरायला न्यायला एक उत्तम ठिकाण आहे. हे अतिशय भव्य गार्डन आहे. जिथे मुलं बोटिंगचा आनंद घेऊ शकतात.

3. बॉटनिकल गार्डन (Tourist Places in Mumbai)

लहान मुलांना फिरायला नेण्यासाठी मुंबईतील सायन परिसरात असलेले बॉटनिकल गार्डनदेखील कमाल जागा आहे. इथे अनेक प्रकारची विविध झाडे आहेत. जी पाहून मुलांनाही थोडं फ्रेश वाटेल.

4. नेहरू तारांगण

मुंबईतील वारली भागात असलेले नेहरू तारांगण मुलांना आकाशाची सफर घडवेल. (Tourist Places in Mumbai) अंतराळ तसेच ग्रह, ताऱ्यांच्या निरीक्षणाची संधी मुलांना मिळेल. त्यामुळे आकाशाचे आभासी भ्रमण करून मुलंही खुश होतील.

5. तारापोरवाला मत्स्यालय

मुंबईतील मरीन लाईन्स येथे असेलेले तारापोरवाला मत्स्यालय हे देखील लहान मुलांना फिरायला न्यायला खूप चांगले लोकेशन आहे. (Tourist Places in Mumbai) इथे लहान मुलांना विविध प्रकारचे मासे तसेच सागरी जीव पहायला मिळतात. जे पाहून मुलांना वाटणारे कुतूहल त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते.

6. एलिफंटा लेणी

मुलांना इतिहासाठी ओळख करुन द्यायची असेल तर त्यांना एलिफंटा लेणी नक्की दाखवा. १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. (Tourist Places in Mumbai) घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. मुंबईपासून हे ६ ते ७ मैल अंतरावर समुद्रातील ‘घारापुरी’ या लहान बेटावर डोंगरात कोरलेल्या आहेत.