लोणावळ्यातील पर्यटनस्थळी सहानंतर फिरण्यास बंदी; थेट मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

Lonavala
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळ्यात पर्यटकांना लोणावळा, खंडाळा, माथेरान अशी स्थळे आकर्षित करत आहेत. त्यामुळे अशा स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या २ दिवसांपूर्वीच
लोणावळ्यातील भूशी डॅम (Bhushi Dam) धबधब्यात एक कुटुंब वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतरच लोणावळ्यात (Lonavala) संध्याकाळी सहानंतर पर्यटन स्थळे फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सध्या लोणावळ्यामध्ये विविध पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पर्यटकांच्या हलगर्जीपणामुळे अनेक वाईट घटना देखील घडत आहेत. त्यामुळेच या पर्यटकांसाठी कठोर नियम आखण्यात आले आहेत. त्याचबरोबर संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना लोणावळ्यातील पर्यटनस्थळी फिरण्यास मजाव करण्यात आले आहे. या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास पर्यटकांवर कारवाई केली जाईल, असे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी सांगितले आहे की, आता इथून पुढे लोणावळ्यात हुल्लडबाजी करणऱ्या तरुणांवर कठोर कारवाई केली जाईल. इतर पर्यटांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही. सार्वजनिक सुट्ट्या आणि विकेंडला अनेक तरुण-तरुणी पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येत असतात. त्यांच्याकडून रात्री गोंधळ घालणे, हुल्लडबाजी करणे असे प्रकार करतात, अनेकवेळा तर हेच प्रकार त्यांच्या जीवावर बेततात. त्यामुळे अशांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.