तर्राट तळीरामाच्या दुचाकींचा अपघात; दोघे जखमी

0
32
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | दारू पिऊन तराट झालेल्या तळीरामांचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ही दुचाकी स्कुटी चालकाला धडकली या अपघातात दोन्ही तळीराम गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास बस स्थानकाजवळील वरच गणेश भरात गणेश मंदिरासमोर घडली नागरिकांनी दोन्ही जखमींना रुग्णालयात हलविले.

सकाळी बारा वाजेच्या सुमारास (एम.एच.21,एम.ए 7257) या दुचाकीवर दोन तरुण यथेच्छ मधप्राशन करून दुचाकीवरून जात होते. वरद गणेश मंदिर चौकात येताच त्यांचा दुचाकीवरील नियंत्रण सुटले व समोरून येणाऱ्या एका दुचाकीला धडकले, समोरासमोर झालेल्या या अपघाता नंतर दोघेही मधपी दूरवर अंतरावर फेकले गेले.त्यामधील एक जण जागेवरच बेशुद्ध झाला होता तर दुसरा वेदनेने विव्हळत होता. नागरिकांनी या दोन्ही जखमींना खाजही वाहनातून रुग्णालयात हलविले. दुपारपर्यंत या दोन्ही जखमींची नावे संमजू शकली नाही तर स्कुटी चालकाची देखील तक्रार नसल्याने त्यानेही तेथून काढता पाय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here