Toyota Glanza CNG कार लॉन्च ; 31 किमी मायलेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Toyota Glanza CNG) वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळत आहे. त्यामुळे अनके वाहन निर्माता कंपन्यांनी CNG गाड्यांची निर्मिती करत आहेत. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाईनंतर आता टोयोटानेही आपला मोर्चा CNG कडे वळवला आहे. टोयोटाने आपली Glanza CNG मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या गाडीचे बुकिंगही सुरू झाले आहे. चला आज आपण जाणून घेऊया या कार मधील खास फीचर्स आणि किमतीबद्दल ….

इंजिन –

टोयोटा ग्लांझा ला (Toyota Glanza CNG) 1.2-लिटर K-सिरीज इंजिन मिळते. हे इंजिन CNG मोडमध्ये 77.5PS कमाल पॉवर आणि 98.5Nm टॉर्क देते. तर पेट्रोल मोडमध्ये , हे इंजिन 90PS पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. CNG मॉडेल फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह ऑफर केले जाते, तर पेट्रोल व्हेरियंटला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो.

Toyota Glanza CNG

30.61 km/kg मायलेज –

कंपनीचा दावा (Toyota Glanza CNG) आहे की Glanza चे CNG मॉडेल 30.61 km/kg मायलेज देते. पेट्रोल मॉडेलचे मॅन्युअल वेरिएंट 22.35 km/l आणि ऑटोमॅटिक वेरिएंट 22.94 km/l मायलेज देण्यास सक्षम आहे. तथापि, कंपनीने त्याच्या CNG प्रकारात आइडियल स्टार्ट-स्टॉप फंक्शन दिलेले नाही, जे पेट्रोल मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. गाडीचे इंजिन 5-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कारमध्ये ५५ लिटरचा सीएनजी टँक देण्यात आला आहे, जो १० किलोच्या बरोबरीचा आहे.

Toyota Glanza CNG

फीचर्स – (Toyota Glanza CNG)

टोयोटा ग्लान्झा सीएनजीच्या बॉडी डिझाइनमध्ये कोणतेही मोठे बदल दिसत नाहीत, त्यात फक्त नवीन अलॉय व्हील आणि मागील बाजूस स्प्लिट टेल-लाइटचा समावेश आहे. याशिवाय कारमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, एलईडी फॉग लॅम्प्स, 16-इंच अलॉय व्हील, 7-इंच स्मार्ट प्लेकास्ट प्रो टच इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड्स-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल देखील आहेत. , क्रूझ कंट्रोल. टेलिस्कोपिक ऍडजस्टेबल स्टीयरिंग व्हील आणि 6 एअरबॅग्ज सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

Toyota Glanza CNG

 

किंमत –

गाडीच्या किमतीबाबत बोलायच (Toyota Glanza CNG) झाल्यास, ग्लान्झा ई सीएनजी एस एमटी या कारची किंमत ८ लाख ४३ हजार रुपये आहे, तर ग्लान्झा ई सीएनजी जी एमटी या कारची किंमत ९ लाख ४६ हजार रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आधारावर लागू आहेत.

हे पण वाचा :

Maruti Suzuki Baleno Delta CNG : मारुतीची ही CNG कार बाजारात घालणार धुमाकूळ; 31 किमीचे मायलेज

Maruti Ertiga CNG : Maruti Suzuki च्या या CNG कारला ग्राहकांची मोठी मागणी; खास कारण काय?

Alto K10 vs Alto 800 : मारुती Alto K10 vs Alto 800; कोणती कार आहे बेस्ट?

Honda Car : Honda च्या या गाड्यांवर 63,000 रुपयांपर्यंत बंपर सूट; तुम्हीही घ्या फायदा