Toyota Urban Cruiser Hyryder 2022 : Toyota ची Urbun Cruiser Hyryder लॉन्च; सेल्फ चार्जिंगचे दमदार फीचर्स

Toyota Urban Cruiser Hyryder 2022
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. जगातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी टोयोटाने शुक्रवारी भारतात आपली नवीन हायब्रीड इलेक्ट्रिक (Toyota Urban Cruiser Hyryder 2022) SUV टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर लॉन्च केली आहे . ही कार पेट्रोल इंजिन आणि इलेकट्रीक मोटार या दोन्हींच्या कॉम्बिनेशनने चालते. विशेष म्हणजे ही सेल्फ चार्जिंग तंत्रज्ञान असल्याने ही SUV स्वतः चार्ज करते..

डिझाईन-

कार च्या लुक बाबत बोलायच झालं तर टोयोटाच्या या (Toyota Urban Cruiser Hyryder 2022) हाईराइडरला LED DRL हेडलॅम्प आहेत. मागील बाजूस, Hyryder ला टोयोटा लोगोसह स्लिम C-आकाराचे टेल लॅम्प लॅम्पही सुंदर डिझाइनने सुसज्ज आहे. हेड-अप डिस्प्ले व्यतिरिक्त, कारमध्ये 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा आहे. वायरलेस चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे. कारमध्ये 9-इंच स्मार्टप्लेकास्ट स्क्रीन आहे. तुम्ही कारचा एसी लांबूनही चालू आणि बंद करू शकता.

Toyota Urban Cruiser Hyryder 2022

इंजिन- (Toyota Urban Cruiser Hyryder 2022)

टोयोटाच्या या SUV मध्ये (Toyota Urban Cruiser Hyryder 2022) 1.5 लिटर K Series इंजिन असून हे 103 bhp पॉवर आणि 137 Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये सेल्फ चार्जिंग इलेकट्रीक मोटार तंत्रज्ञान आहे. या एसयूव्हीमध्ये 177.6 V लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. जे 25 किमी पर्यंत पूर्ण-इलेक्ट्रिक रेंज देते. कंपनीने दावा केला आहे की. SUV एकूण 24-25 kmpl चा मायलेज देते. तुम्ही ही कार ड्राइव्ह मोड आणि इलेक्ट्रिक वाहन मोडमध्ये चालवू शकता.

Toyota Urban Cruiser Hyryder 2022

6 एअरबॅग्ज-

SUV मध्ये 17 इंच अलॉय व्हील आहेत. हेड अप डिस्प्ले देखील आहे. तसेच या हाईराइडरमध्ये (Toyota Urban Cruiser Hyryder 2022) 6 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ESP, हिल-होल्ड असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल यासारखे सेफ्टी फीचर्सही कंपनीने दिले आहेत. कंपनी आपली ही नवीन SUV ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2022 मध्ये बाजारात लॉन्च करणार आहे. टोयोटाच्या या हाईराइडरची किंमत अंदाजे ९.५० लाख पेक्षा जास्त असेल. ग्राहक 25,000 रुपयांच्या टोकन रकमेसह ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंग करू शकतात.

हे पण वाचा :

Maruti Suzuki Brezza 2022 : मारुती सुझुकीने लॉंच केली नवी Brezza; पहा वैशिष्ट्य आणि किंमत

Honda N7X : होंडाची ही नवीन SUV देणार Mahindra XUV700 ला तगडी फाईट; जाणून घ्या किंमत अन लॉंचची तारीख

Best 7 Seater Car : मारुतीच्या Ertigaची किंमत फक्त 2 लाखांपासून सुरू; पहा कुठे आहे  ऑफर

Smartphones वर बंद झालेली कॉल रेकॉर्डिंगची सुविधा अशा प्रकारे सुरु करा