नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ, रस्त्याचे काम पाडले बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक

नक्षली कारवायांमुळे नेहमी चर्चेत असणार्‍या गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ करत रस्त्याचे काम बंद पाडल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री उशीरा एटापल्ली तालुक्यातील जांबिया गट्टा पोलीस मदत केंद्रातील पुस्के गावाजवळ सुरु असलेल्या रस्त्याच्या कामावरील ४ ट्रेक्टर जाळले. यावेळी नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामाला विरोध करत वाहनांची जाळपोळ केली. तसेच रस्त्याचे काम बंद करण्याची सुचना देऊन नक्षलवादी निघून गेले.

नक्षलवाद्यांशी लढा देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असे म्हणुन पाठ थोपवून घेणार्या पोलीस प्रशासनासाठी नक्षल्यांच्या या कारवाई मुळे चेलेंज निर्माण झाले आहे.

Leave a Comment