व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला बंद कारमध्ये; दोन संशयी पोलिसांच्या ताब्यात

हिंगोली : बाळापूर येथून जवळच असलेल्या धांडे पिंपरी शिवारात उभ्या असलेल्या एका स्कोडा कार मध्ये एक मृतदेह आढळून आला असून हा मृतदेह नांदेडच्या व्यापाऱ्याचा असल्याची माहिती मिळाली आहे. सायंकाळी ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांना घातपाताचा संशय असून पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

आखाडा बाळापुर पोलिसांना कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या डोक्यावरील केस जळालेले होते. तसेच कारच्या आतील भागपण जळालेला आढळून आला. त्यामुळे हा खून केल्या असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झाले. मयत व्यक्तीच्या भ्रमणध्वनीवरून इतरांशी संपर्क साधला असता सदर मृतदेह मयत माणिक राजाराम राज गोरे (वय 50) रा. कलद गाव जि. नांदेड येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाळापुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. सदर व्यापाऱ्याचा मृत्यू 24 तासापूर्वी झाला असावा अशी शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तर मृतदेहाच्या गळ्याभोवती आवळ्याच्या खुणा आढळून आल्या.त्यामुळे शनिवारी सकाळी मृतदेह नांदेड येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाण्यासाठी पोलीस अधीक्षकराकेश कलासागर,सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी गुन्हे पथकाला शाखेच्या पथकाला शुक्रवारी रात्री घटनास्थळी रवाना केले. गुन्हे शाखेचे निरीक्षक उदयन खंडेराय उपनिरीक्षक शिव सांब घेवारे,किशोर पोटे जमादार विलास सोनवणे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, यांच्या पथकाने नांदेड भागात चौकशी सुरु केली. शनिवारी पहाटे पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. याशिवाय प्रकरणात आणखीन काही जणांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक नांदेडकडे रवाना झाले आहे. दरम्यान मयत माणिक राजगुरे हे नांदेड येथे मालमत्ता खरेदी-विक्रीचा तसेच वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. मागील पंधरा वर्षांपासून ते नांदेडात राहतात. दरम्यान शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु होती.

You might also like