औरंगाबाद: कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन कोविड चाचणी करून घेणाऱ्या व्यापारी व दुकानदारांची महानगरपालिकेच्या रुग्णालयात गर्दी होत असे. यामुळे मनपा प्रशासनाने आज सोमवार पासून सहा ठिकाणी तपासणी सुरू केली. याला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.
सध्या शहरात कोरोना संसर्ग वाढत आहे. या वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयात नागरिकांबरोबर व्यापारी व दुकानदाराची गर्दी होत आहे. यामुळे संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता आहे.
ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने आज सोमवार पासून विविध सहा ठिकाणी चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. यात फॅशन बाजार साजन सरिता समोर टिळक पथ पैठणगेट , पाटीदार भवन जालना रोड , अग्रसेन भवन कॅनॉट प्लेस, जिजाई हॉस्पिटल गजानन मंदिर गारखेडा परिसर, अपना बाजार जालना रोड, बालाजी धर्मशाळा शहागंज आदींचा समावेश आहे. या ठिकाणी व्यापाऱ्यांनी व कामगारांनी अक्षरश: रांगा लावत तपासणी करून घेतली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group