पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. गुरुवारी सुद्धा हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. मात्र आता अखेर स्वारगेट मेट्रोच्या उदघाटनाला नवा मुहूर्त मिळला असून. पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच स्वारगेट मेट्रोचे उदघाटन होणार आहे. रविवारी (29) शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे उदघाटन होणार आहे.
हा सोहळा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होणार आहे. त्यामुळे . या परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
क्या करण्यात आले बदल ?
- स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौक ते सारसबाग परिसरातील जमनालाल बजाज पुतळा परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
- आवश्यकतेनुसार जेधे चौक ते जमनालाल बजाज पुतळा दरम्यान दुहेरी वाहतूक सुरु ठेवण्यात येईल.
- आवश्यकतेनुसार या भागातील वाहतूक बंदही ठेवण्यात येईल.
- वाहनचालकांनी जेधे चौकातून व्होल्गा चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह, मित्रमंडळ चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
- सातारा रस्त्याने उड्डाणपुलावरुन सोलापूर रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत राहणार आहे.
- शिवाजीनगर न्यायालय परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
- छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक ते तोफखाना चौक रस्ता परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
- छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक मार्ग आवश्यकता भासल्यास दुहेरी करण्यत येईल.