हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Traffic Jam । वाहतूक कोंडी हा आपल्या देशाला अजूनही न सुटलेला प्रश्न आहे. देशातील मोठमोठ्या शहरात तसेहच महत्वाच्या महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळतेय.. यावर उपाय करण्यासाठी मेट्रो आल्या, वंदे भारत ट्रेन आली, नवनवीन पूल उभारण्यात आले, मात्र वाहतूक कोंडी अजूनही जैसे थेच आहे. मध्य प्रदेशात तर काल हद्दच झाली. इंदोर मध्ये तब्बल ३२ तासांची वाहतूक कोंडी पाहायला मिळाली… सर्वच गाड्या एकाच जाग्यावर होत्या. ८ किलोमीटर पर्यंत गाड्यांची रांग लागली होती. या वाहतूक कोंडीत ३ लोकांना आपला प्राण गमवावा लागला.
नेमकं काय घडलं? Traffic Jam
इंदौर-देवास महामार्गावरील अर्जुन बडोदाजवळ पुलाचं बांधकाम सुरू आहे. पावसामुळं संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. अशा स्थितीत गुरुवारी रात्री उशिरापासून ३२ तासांची वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली होती. या वाहतूक कोंडी दरम्यान, ४ हजार वाहने अडकली. जवळपास ८ किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका तसेच ट्रक, कार आणि स्कूल बससह इतर वाहनंही अडकली होती. वाहतूक कोंडीत अडकल्यानं तिघांना प्राण गमवावे लागले आहेत. या दरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला. यातील दोघांना हृदयविकाराचा झटका आला तर एका रुग्णाचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.
या जाममध्ये (Traffic Jam) अडकलेल्या इंदूर येथील एका वृद्ध शेतकऱ्याला त्याच्या गाडीत पॅनिक अटॅक आला, त्याची गाडी दीड तास जाममध्ये अडकली होती. त्याला देवासमधील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. असे म्हंटल जात आहे की ६२ वर्षीय शेतकरी कमल पांचाळ हे त्यांच्या बहिणीच्या तेराव्या दिवसाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी त्यांच्या कुटुंबासह देवास येथे येत होते. या दरम्यान, अर्जुन बडोदाजवळ गाडी जाममध्ये अडकली. ते प्रचंड घाबरले, त्यांचा श्वास कोंडू लागला. त्यानंतर त्यांच्या मुलाने गाडी बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु ते शक्य झालं नाही. सुमारे दीड तासांनंतर, बाहेर पडून त्यांना देवासमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
लोकांच्या म्हणण्यानुसार, अनेक स्कूल बसही जाममध्ये अडकल्या होत्या. त्यामुळं विद्यार्थ्यांचे कुटुंबीय कसेबसे दुचाकीवरून आले आणि मुलांना घेऊन घरी परतले. विशेष म्हणजे, एवढी मोठी वाहतूक कोंडी होऊनही नाममात्र वाहतूक पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. खरं तर या परिसरातील वाहतूक कोंडी (Traffic Jam) विरोधात लोक सतत आवाज उठवत आहेत, परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.