पुणे प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ७४ वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्रात सर्वत्र कलम १४४ लागू केल्याची घोषणा केली. घराबाहेर न पडण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. मात्र तरीही शासनाच्या जमाबंदी आदेशाला हरताल फासत पुणेकरांनी रस्त्यांवर गर्दी केली आहे.
#पुणे : जमावबंदी असताना पुण्यातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी#HelloMaharashtra #COVIDー19 #COVID19outbreak #GoCoronaCoronaGo #COVIDIOTS #lockdown pic.twitter.com/7m12mlerW4
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 23, 2020
पुण्यातील रस्त्यांवर बर्यापैकी वाहतुक दिसत आहे. अनेक नागरिक घरातून बाहेर पडले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी ३१ मार्च पर्यंत सर्वत्र बंद राहील. नागरिकांनी अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन केले होते. मात्र तरीही पुण्याच्या रस्त्यांवर वाहतुक का दिसत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, राज्यात जमावबंदी असताना नागरिक रस्त्यावरुन फिरताना दिसत आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी असे घरातून बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.