अरे जरा आवर घाला..! लॉकडाऊनमध्ये देशात ‘पॉर्न’ पाहणाऱ्यांचे प्रमाण ९५ टक्क्यांनी वाढले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउन आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दिड महिन्यापासून घरात कोंडून असलेल्या जनतेला बाहेर फिरता येण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळं लॉकडाउनच्या या काळात घरात आणखी काही दिवस मोबाईल किंवा इतर काही गोष्टी करण्यात नागरिकांना वेळ घालवावा लागणार आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या काळात मोबाईलवर वेळ घालवणाऱ्या भारतीयांबाबतीत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एक सर्वेक्षणांतून आलेल्या माहितीनुसार लॉकडाउनमध्ये पॉर्न बघणाऱ्या भारतीयांचं प्रमाण प्रचंड वाढलं असल्याचा म्हटलं गेलं आहे.

लॉकडाउनच्या या कालावधीत ऑनलाईन पॉर्न बघणाऱ्यांसंदर्भात भारतात एक सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणात भारतात पॉर्न पाहणाऱ्यांच्या प्रमाणात ९५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी ८९ टक्के भारतीय मोबाईलवरून थेट साईटवर जाऊन पॉर्न बघतात. तर ३० ते ४० टक्के भारतीय पॉर्न ग्राहक हे व्हिडीओ डाउनलोड करून पाहतात, असं या सर्वेक्षाणातून समोर आलं आहे. पॉर्न बघण्याचं प्रमाण वाढण्यामागे एक महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे स्वस्त झालेला इंटरनेट डेटा. भारतात इंटरनेट डेटा खूप स्वस्तात मिळतो, त्याचबरोबर तारुण्यात येणारी ही पिढी फ्री पॉर्नच्या सापळ्यात अडकली जात आहे.

विशेष म्हणजे केंद्र सरकारनं ३ हजार ५०० पॉर्न साईट बंद केल्यानंतरची ही आकडेवारी झोप उडवणारी आहे. केंद्र सरकारनं कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन वेळ लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला. या काळात सगळंचं बंद असलं तरी लैगिक शोषणाच्या घटनांना प्रोत्साहन देणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”