हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकर आपल्या खास शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. तसेच यातील पुणे पोलिसही आपल्या कारवाईने प्रसिद्ध आहेत. ते कशा प्रकारची कारवाई करतील याचा काही नेम नाही. नुकताच त्यांच्या हटके कारवाईचा प्रत्यय पुणेकरांना आला. पुण्यातील एका बाजारपेठेत नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चक्क त्या दुचाकीस्वारांसह वाहतुक पोलिसांनी क्रेनच्या साह्याने उचलली. याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
कारवाई अशीही करतात हे आज पुणे पोलिसांनी दाखवलं…@CPPuneCity @PuneCityPolice @PuneCityTraffic pic.twitter.com/nZBWjSpSWH
— Ashwini Satav-Doke (@SatavDoke) August 20, 2021
पुण्यातील एका महिला पोलिसांचे फुकटच्या बिर्याणीच्या प्रकरणानंतर पुणे पोलीस सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. त्यानंतर आता पुन्हा एका पोलिसांच्या कारवाईची चर्चा पुण्यात चांगलीच रंगली आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात निर्बंधात शिथिलता देण्यात आल्याने बाजारपेठाही सुरु झाल्या आहेत.
खरेदी करण्यासाठी लोकही बाहेर पडू लागले आहेत. पुण्यातील छोट्या बाजारपेठांमध्ये साहित्य खरेदी करण्यासाठी आलेले लोक आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. ती टाळण्यासाठी वाहतूक पोलीस क्रेनच्या साह्याने संबंधित वाहने उचलत आहेत. अशी हटके कारवाईचा व्हिडीओ सध्या चर्चेत आलेला आहे.
https://www.facebook.com/100002801162769/posts/3575707259199278/
पुण्यातील एका बाजारपेठेत एका दुचाकीस्वाराने आपली दुचाकी नो पार्किंगमध्ये लावली होती. त्यावेळी त्या ठिकाणी वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यानी येऊन वाहने उचलण्यास सुरुवात केली. आपलीही दुचाकी उचलत असल्याचे संबंधित दुचाकीस्वाराने पाहिले असता तो तत्काळ दुचाकीवर जाऊन बसला. त्यावेळी पुणे पोलिसांनी त्याला दुचाकीसह उचलून क्रेनमध्ये बसवले. पुणे पोलिसांच्या या हटके कारवाईचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.