Traffic Update : अलर्ट व्हा …! घोडबंदर रोडवर 6 जूनपर्यंत ‘या’ वाहनांना नो एन्ट्री, पहा पर्यायी रस्ते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Traffic Update : तुम्ही जर घोडबंदर रोडवरून प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. महाराष्ट्रातून गुजरातला जाणाऱ्या मार्गापैकी हा एक महत्वाचा मार्ग आहे. हा रोड पुढील काही दिवस बंद राहणार आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे त्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे पोलिसांच्या कडून (Traffic Update) या मार्गावर ६ जून पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी दिनांक 24 मे 2024 पासून घालण्यात आली आहे.

प्रामुख्याने मुंबई गुजरात भिवंडी आणि उरण मधील जेएनपीटी बंदरातून गुजरात मार्गावर माल वाहून येणारी हजारो वाहन ही घोडबंदर रोडचा वापर करतात. याबरोबरच मुंबई, वसई, विरार, भाईंदर मधील छोट्या वाहनांकडूनही मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर केला जातो. याशिवाय या रस्त्यावर बसेसची सुद्धा वर्दळ असते त्यामुळे हा रोड नेहमी (Traffic Update) गजबजलेला असतो.

कोणत्या वाहनांना परवानगी? (Traffic Update)

दिनांक 24 मे ते 6 जून या दरम्यान या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मात्र हलक्या वाहनांना या मार्गावरून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवाय दुरुस्ती सुरू असतानाही येथील वाहतूक सिंगल लेन पद्धतीने सोडली जाण्याची शक्यता घोडबंदर मार्गावरील घाटाजवळ चा रस्ता हा अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे एकाच वेळी अवजड वाहनांना (Traffic Update) आणि हलक्या वाहनांना भार वाढवल्यास ठाणे घोडबंदर आणि मुंबई अहमदनगर मार्गावर वाहनांच्या रांगा लागू शकतात.

वाहतुकीत केलेले बदल (Traffic Update)

  • नाशिककडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या जड/अवजड वाहनांना मानकोली नाक्यावर प्रवेशबंदी असेल. या वाहनांना मानकोली पूलाखालून अंजुरफाटा मार्गे जावे लागेल.
  • गुजरातमधून घोडबंदर मार्गे ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या जड/अवजड वाहनांना चिंचोटी नाक्याजवळ प्रवेशबंदी असेल. ही वाहने चिंचोटी नाका येथून कामन, अंजुरफाटा मानकोली, भिवंडी मार्गाने जातील.
  • मुंबई, ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड/अवजड वाहनांना कापूरबावडी चौक आणि माजिवड्याजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेच्या ऑफिसजवळून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गाने किंवा कशेळी, अंजुरफाटा मार्गे पुढे निघतील.
  • मुंब्रा, कळव्यावरुन घोडबंदरच्या दिशेने येणाऱ्या जड/अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद केला जाईल. ही वाहने खारेगाव खाडी पूलाखालून खारेगाव टोलनाका, मानकोली मार्गे जातील.