दुःखद घटना! रक्षाबंधनसाठी बहिणीला आणायला गेलेल्या भावाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड | रक्षाबंधन हा बहीण भावाचा खास सण असतो. सासरवासीन बहिणीला रक्षाबंधनासाठी माहेरी आणण्यासाठी भाऊ तिला घेण्यासाठी जात असतो. यातच रक्षाबंधन उद्यावर असताना बहिणीला आणायला गेलेल्या भावाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे.

गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील रहिवासी असलेला मयत उमेश काळे (28) हा बहिणीला आणण्यासाठी माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली येथे गेला होता. गुरुवारी बहिणीच्या घरी कपडे इस्त्री करत असताना विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. यावेळी बहिणीच्या सासरच्या मंडळींनी उमेशला माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृत उमेश वर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. उमेश ची पत्नी मुलगा भाऊ आई-वडील असा त्याचा परिवार होता.

Leave a Comment