सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
माण तालुक्यातील म्हसवड येथे कोरोना सेंटरमध्ये एका 10 वर्षीय बालकांच्या अंगावर कपाट पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आम्ही म्हसवडकर ग्रुपच्यावतीने लोकवर्गणीतून सेंटरची उभारणी करण्यात आली होती. या सेंटरमध्ये कोरोना बाधित बालकांवर उपचार सुरू असताना ही दुर्देवी घटना घडली आहे.
माण तालुक्यात दुसऱ्या लाटेत गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढलेला होता. अशावेळी आरोग्य यंत्रणेला मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही म्हसवडकर ग्रुपने कोरोना सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये अनेक कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. अशा या लोककल्याणकारी उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या कोरोना सेंटरमध्ये दुर्देवी घटना घडली आहे.
म्हसवडकर ग्रुपने सुरू केलेल्या सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या दहा वर्षीय कोरोना बाधित बालकाचा अंगावर कपाट पडले आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या बालकांच्या मुल्ला कुटुंबातील एकाच घरातील 18 कोरोना बाधित आलेले आहेत. यामध्ये 6 बालके आणि 12 स्त्री-पुरुष कोरोना सेंटरमध्ये दाखल होते. या सेंटरमध्ये पोलिसांनी पंचनामा करून सदरील घटनेचा अपघात म्हणून गुन्हा दाखल केला आहे.