साडीचा झोका घेणं मुलीच्या जीवावर बेतलं, धारावीमधील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील धारावीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये साडीचा झोका घेणे 13 वर्षीय मुलीच्या जीवावर बेतले आहे. यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मृत 13 वर्षीय मृत मुलगी धारावीतील राजीव गांधी नगर परिसरात कुटुंबियांसोबत राहात होती.

घटनेच्या दिवशी हि मृत मुलगी नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या पोटमळ्याला साडीने बांधलेल्या झोक्यावर खेळत होती. झोका खेळत असताना अचानक तिचा तोल गेला. यानंतर तिने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, साडीचा फास तिच्या गळ्याभोवती घट्ट झाल्याने ती बेशुद्ध झाली.

यानंतर मुलीला फास बसल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी तिला खाली उतरवत तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र या ठिकाणी उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी धारावी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment