‘पागलपंतीचा’ दुसरा ट्रेलर रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । जॉन अब्राहमच्या कॉमेडी फिल्म पागलपंतीचा नवा ट्रेलर रिलीज झाला आहे. हि एक मल्टीस्टारर फिल्म आहे , आणि त्याचा पहिला ट्रेलर लवकरच रिलीज झाला होता. ट्रेलरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता चित्रपटाचा नवा ट्रेलरही रिलीज करण्यात आला असून त्यात जॉन अब्राहम अरशद वारसी आणि पुलकित सम्राट यांची आहे .

Pagalpanti Trailer - Anil, John, Ileana, Arshad, Urvashi, Pulkit, Kriti | Anees | Releasing 22 Nov

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कॉमेडी बरोबरच भरपूर अ‍ॅक्शन असल्याचेही दिसून येते. चित्रपटामध्ये अर्शद, जॉन आणि पुलकित यांनी एकीकडे जबरदस्त विनोद केले आहेत, तर दुसरीकडे अनिल कपूर आणि सौरभ शुक्ला यांनीही या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. अनिल कपूरची भूमिका या चित्रपटातील वेलकम मूव्हीच्या भूमिकेशी बरीच मिळते जुळते आहे .

Pagalpanti Trailer 2 | Anil, John, Ileana, Arshad, Urvashi, Pulkit, Kriti | Anees | Releasing 22 Nov

चित्रपटाच्या कथेला काही विशेष बळकटी वाटत नाही. पण रिलीज झालेल्या दोन्ही ट्रेलरमध्ये हा चित्रपट विनोदी दृश्यांनी परिपूर्ण असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. काही काळापूर्वी अक्षय कुमारचा हाऊसफुल 4 हा विनोदी चित्रपट रिलीज झाला होता जो प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. जॉन अब्राहमचा हा चित्रपट काय करिश्मा दाखवतो हे आता पाहायला मिळेल. हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.