Train Accident | दररोज कुठे ना कुठे अपघात घडल्याच्या बातम्या समोर येत असतात. अशातच एक मोठा रेल्वेचा अपघात घडलेला आहे. तमिळनाडूमधील कावराई पेट्टई स्थानकाजवळ एक मोठा रेल्वेचा अपघात झालेला आहे. मैसूर दरभंगा बागमती एक्सप्रेस आणि एका स्थिर मालगाडीची टक्कर झाल्याने बागमती एक्सप्रेसचे जवळपास 12 ते 13 डबे रुळावरून घसरले आहेत. आणि एक मोठा अपघात (Train Accident ) झालेला आहे. या अपघातात 19 प्रवासी जखमी झालेले आहेत. 11 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडलेली आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार बागमती एक्सप्रेस म्हणजेच गाडी क्रमांक 12578 मैसूर वरून डिब्रूगढला जात होती. तेव्हा ती कावराईपट्टीई या स्थानकात प्रवेश करत होती. यावेळी गाडीला मुख्य मार्गावरून जाण्यासाठी सिग्नल देण्यात आले होते. परंतु काही कारणांमुळे ट्रेन मुख्य मार्गाऐवजी लूक लाईन मध्ये घसरली. आणि 75 किलोमीटर प्रति तास वेगाने स्थिर असलेल्या मालगाडीला धडकली आणि त्यामुळे गाडीचे 12 – 13 डबे रुळावरून खाली घसरले.
तमिळनाडूमध्ये झालेल्या या मोठ्या अपघातानंतर (Train Accident ) तेथील मुख्यमंत्री एम के स्टाईलहे त्वरित तेथे आले होते. आणि मदत कार्य त्यांनी सुरू केलेले आहे. यासाठी त्यांनी एक मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्याची देखील नियुक्ती करण्यात केलेली आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी सांगितले की, या या अपघातामध्ये सहा डबे रुळावरून घसरले आहेत. आणि दोन डब्यांना आग लागलेली आहे. तसेच या अपघातात 19 प्रवासी जखमी झालेले आहेत. इतर 3 लोकांची प्रकृती गंभीर आहे.
या अपघातात (Train Accident ) जे प्रवासी जखमी झालेले आहे. त्यांना सरकारी स्टेनली मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल केलेले आहे .तसेच या दोघांच्या प्रकृतीवर सातत्याने डॉक्टर लक्ष ठेवून आहे. तर उर्वरित 13 जखमी प्रवाशांना पोननेरी सरकारी रुग्णालयात उपचार दिले जात आहेत. त्याचप्रमाणे या गाडीतील 1300 प्रवाशांना सुरक्षित रित्या बाहेर काढलेले आहे. त्यानंतर यातील काही प्रवाशांची व्यवस्था लग्न हॉलमध्ये करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी त्यांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधा देखील पुरविण्यात आलेल्या आहेत. परंतु अजूनही या दुर्घटनेचे काम सुरू आहे. या दुर्घटनेमध्ये आणखी कोण कोणती हानी झालेली आहे. या गोष्टींचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.