ड्रायव्हर अन पट्रीशिवाय धावणारी ट्रेन; तुम्हीही म्हणाल क्या बात है

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सर्वाना ट्रेनचा अनुभव नेहमी आरामदायी अन सोयीचा वाटतो. मग तो पटरीवर धावणाऱ्या पारंपरिक ट्रेनचा असो की अन्य कोणताही. पण तुम्हाला माहिती आहे का, एक अशी ट्रेन आहे जिला ना ड्रायव्हरची गरज आहे आणि ना पट्रीची. हे ऐकून जरा वेगळं वाट असेल ना , पण हे खर आहे. अशी एक ट्रेन अस्तित्वात असून, तिला ‘वर्च्युअल ट्रेन’ असे म्हंटले जाते. पण अशी अनोखी ट्रेन कुठे आहे , ती ड्रायव्हर शिवाय कशी धावते , त्या ट्रेनचे वैशिष्ट्य काय आहेत , हे आपण आज जाणून घेणार आहोत.

ट्रेन डामरच्या रस्त्यावर धावते –

ही ट्रेने एकत्रितपणे बस आणि ट्रामचा संगम आहे. 2019 मध्ये चीनच्या सिचुआन प्रांताच्या यिबिनमध्ये ही अनोखी ट्रेन लाँच करण्यात आली होती. स्टीलच्या पट्ट्याऐवजी, ही ट्रेन डामरच्या रस्त्यावर धावते आणि ती खास पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांवर चालते. या ट्रेनला हायब्रीड ट्राम-बस म्हणता येईल कारण ती बससारख्या रस्त्यांवर धावते, तर ट्राम सारखी कार्ये करते.

ट्रेनला चालकाची गरज नाही –

दोन वर्षांच्या चाचणीच्या नंतर, या ट्रेनने सध्या रस्त्यावर प्रवास सुरू केला आहे. या ट्रेनला चालकाची गरज नाही, पण आपत्कालीन स्थितीत चालक असतो. याची स्पीड 70 किलोमीटर प्रति तास आहे. पारंपरिक ट्रेन्सच्या तुलनेत, ही ट्रेन खूप हलकी आहे आणि तिचे टायर रबरी असतात. ही ट्रेन रस्त्यावर, कार आणि बसच्या मध्ये धावते, ज्यामुळे यातून लोकांना एक नवीन आणि वेगळा अनुभव मिळतो.

ट्रेनमध्ये 500 लोक एकत्र प्रवास –

या ट्रेनमध्ये तीन बोग्या असतात आणि ती 300 लोकांना एका वेळी घेऊन जाऊ शकते. जर गरज पडल्यास, दोन अधिक बोग्या जोडता येऊ शकतात, ज्यामुळे या ट्रेनमध्ये 500 लोक एकत्र प्रवास करू शकतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रेन पेट्रोल किंवा डिझेलवर चालत नाही, तर लिथियम-आयन बॅटरीवर चालते. बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर, ही ट्रेन 40 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

निर्मितीसाठी 15 ते 25 करोड रुपये –

ही ट्रेन प्रदूषण कमी करणारी आहे, कारण ती बायोफ्यूलवर चालत नाही, आणि रस्ता आणि ट्रेनचा एकत्रित उपयोग करत वातावरणावर कमीत कमी परिणाम होतो. खर्चाचे प्रमाण देखील कमी आहे, कारण एका किलोमीटरच्या निर्मितीसाठी केवळ 15 ते 25 करोड रुपये लागतात. ही ट्रेने भविष्यकाळातील परिवहनाचे उदाहरण आहे आणि तिच्या सुरुवातीला आपल्याला तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे एक उत्कृष्ट मिश्रण पाहायला मिळते.