रेल्वे तिकिट महागणार, ‘या’ रेल्वे स्टेशन्सवर द्यावे लागणार जास्त पैसे

मुंबई । रेल्वे प्रवाशांवर आर्थिक बोजा वाढवणारी एक बातमी आहे. लवकरचं ट्रेनची तिकिटे महाग होणार आहेत. ज्याप्रमाणे विमानतळांवर युजर चार्ज (User Charge) आकारला जातो त्याप्रमाणे आता देशातील काही प्रमुख रेल्वे स्थानकांवरही (Railway Stations) वापरकर्त्याकडून शुल्क आकारला जाणार आहे. येत्या २ आठवड्यांत वापरकर्त्यांकडून शुल्क आकारण्याबाबत सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. हा शुल्क 10-50 रुपयांदरम्यान असू शकतो. वापरकर्त्याने शुल्क आकारल्यानंतर प्रवाशांना रेल्वेच्या तिकिटासाठी जास्त पैसे मोजावे लागतील.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, येत्या दोन आठवड्यांत काही रेल्वे स्थानकांवर यूजर चार्ज लावण्याबाबत सरकार अंतिम निर्णय घेऊ शकतं. रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) वेगवेगळ्या वर्गातील प्रवाश्यांसाठी 10 ते 50 रुपयांपर्यंत वापरकर्ता शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. फस्ट क्लासच्या प्रवाशांकडून अधिक वापरकर्ता शुल्क आकारला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (your train ticket is going to be expensive user charge will be taken at these 120 stations)

यूजर्स चार्ज किती स्टेशनवर वापरायचा याविषयी रेल्वे मंत्रालय निर्णय घ्यावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 120 प्रमुख स्थानकांवर वापरकर्ता शुल्क आकरण्यात येईल. या स्थानकांमध्ये नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई), नागपूर, तिरुपती, चंदीगड, ग्वाल्हेर, पुडुचेरी आणि साबरमती यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली आणि मुंबईसाठी बोलीची तारीख 18 डिसेंबर आणि 15 डिसेंबर करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’